शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सभापतींविरुद्ध अवमान याचिका सादर करणार: गिरीश चोडणकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 13:14 IST

याचिका सुनावणीस टाळाटाळ.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आठ फुटीर काँग्रेसी याचिकेवर आमदारांविरुद्धच्या अपात्रता सुनावणी घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर हे सभापतीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका सादर करण्याच्या तयारीत आहेत. चोडणकर यांनी ट्रीट करून ही माहिती दिली आहे.

चोडणकर यांनी ट्रीटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने केशाम मेघाचंद्र सिंह प्रकरणात तीन महिन्यांत सभापतींनी अपात्रता याचिका निकालात काढायला हवी, असे स्पष्ट आदेश दिले असतानाही सभापती रमेश तवडकर हे आठ फुटीर काँग्रेसी आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिकेवर सुनावणी घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा हा अवमान ठरतो आणि त्यासाठीच मी अवमान याचिका सादर करण्याच्या तयारीत आहे.

सभापती तवडकर हे याबाबतीत टाळाटाळ करून सर्वोच्च न्यायालयाचा अनादर करत आहेत. भाजपने लोकशाही पायदळी तुडवून सत्ता हडपण्याचे सत्र आरंभले आहे. इतर पक्षांचे आमदार पळवणे एवढेच या पक्षाचे काम आहे. अपात्रता याचिकाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील माझ्या आव्हान याचिकेवर न्यायालयाने सभापती तसेच आठही फुटीर आमदारांना नोटिसा बजावून लोकशाही वाचवण्यासाठी आशेचा किरण दाखवला आहे, असे चोडणकर यांनी पुढे म्हटले आहे. 

विलीनीकरण घटनाबाह्य

याबाबतची पार्श्वभूमी अशी की, १४ सप्टेंबर २०२२ रोजी दिगंबर कामत, मायकल लोबो, रुडॉल्फ फर्नाडिस, राजेश फळदेसाई, डिलायला लोबो, संकल्प आमोणकर, केदार नाईक व आलेक्स सिक्वेरा हे आठ आमदार काँग्रेसमधून फुटले आणि त्यांनी विधिमंडळ पक्षच भाजपमध्ये विलीन केला. हे विलीनीकरण घटनाबाह्य असल्याचा दावा करून गिरीश यांनी अपात्रता याचिका सादर केलेली आहे.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस