शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांकडून बेरोजगार युवकांची थट्टा, गिरीश चोडणकर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 18:54 IST

रोजगार निर्मिती हा चर्चेचा व प्राधान्याचा विषय नाही असे विधान मुख्यमंत्र्यांनी नुकतेच केले आहे.

पणजी -  मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे अपरिपक्व अशी विधाने करत आहेत. रोजगार निर्मिती हा निवडणुकीचा विषयच होऊ शकत नाही असे विधान मुख्यमंत्र्यांनी करून पणजीतील बेरोजगार युवकांची थट्टा केली आहे. त्यांनी क्रुर विनोदच केला आहे, अशी टीका गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मंगळवारी येथे केली.

काँग्रेस हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना चोडणकर म्हणाले, की  पणजीतील पोटनिवडणुकांमध्ये रोजगार निर्मिती हा चर्चेचा व प्राधान्याचा विषय नाही असे विधान मुख्यमंत्र्यांनी नुकतेच केले आहे. म्हणजेच रोजगार निर्मितीचा विषय हा सरकारच्या अजेंडय़ावर नाही असे सावंत म्हणतात. एवढे बेजबाबदार विधान मुख्यमंत्री पदावर असलेल्या नेत्याने तरी करू नये. पणजीत असलेली बेरोजगारीची समस्या मुख्यमंत्र्यांना दिसतच नाही. युवकांमध्ये बरीच बेरोजगारी आहे. त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती करणो हे सरकारचे प्राधान्य असायलाच हवे. पणजीत आता होत असलेल्या पोटनिवडणुकीमध्ये रोजगाराचा विषय नाही असे म्हणणो हे धक्कादायक आहे, असे चोडणकर म्हणाले.मुख्यमंत्रीपदाला त्यांचे विधान शोभत नाही. आम्ही त्यांच्या विधानाचा अतिशय तीव्र शब्दांमध्ये निषेध करतो, असेही चोडणकर म्हणाले. कारवार व कर्नाटकच्या लोकांनी गोव्यात येऊन रोजगार संधी मिळवावी असे मुख्यमंत्री म्हणतात पण पणजीतील बेरोजगारांसाठी रोजगाराची निर्मिती करायला हवी असे ते म्हणत नाही. आपण आता मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहोत याची जाणीवच अजून सावंत यांना झालेली नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून ते अशाच प्रकारे बेजबाबदार विधाने करत आले आहेत, असेही चोडणकर म्हणाले. रोजगाराऐवजी विकास करणो एवढाच निवडणुकीत विषय असल्याचे मुख्यमंत्री सांगतात. विकास म्हणजे निधीचा वापर व भ्रष्टाचार एवढेच मुख्यमंत्र्यांना अपेक्षित आहे काय असे आपण विचारतो. कारण मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी जीएसआयडीसीवरही काम केले आहे व त्यांना विकास म्हणजे काय ते ठाऊक आहे, अशीही टीका चोडणकर यांनी केली. 

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसPramod Sawantप्रमोद सावंत