शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

फॉर्मेलीन प्रकरणात विद्यापीठाची मदत घ्या; मुंबई हायकोर्टाचा गोवा सरकारला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 22:10 IST

विद्यापीठाकडून न्यायालय मागवणार अहवाल

पणजी: फॉर्मेलीन प्रकरणात एका चांगल्या विद्यापीठातील संशोधकांची मदत घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने सरकारला दिला आहे. या प्रकरणातील सर्व याचिका आणि सरकारी एजन्सीकडून सादर करण्यात आलेली कागदपत्रे विद्यापीठाकडे सोपवण्यात येणार असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. मासळीत नैसर्गिक फॉर्मेलीन किती असते, त्याचे परिणाम व संबंधित सर्व माहिती एखाद्या विद्यापीठातील संशोधकाकडून जाणून घ्यावी. असे विद्यापीठ सरकारने निश्चत करावे. महाराष्ट्रातील एखाद्या विद्यापीठाचीही यासाठी मदत घेता येईल, असे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि आर एम बोर्डे यांच्या खंडपीठाने बुधवारच्या सुनावणी दरम्यान सरकारला सांगितले. फॉर्मेलीनयुक्त मासळी प्रकरणात ज्या याचिका दाखल करून घेण्यात आल्या आहेत त्या सर्व त्या विद्यापीठाकडे सोपवल्या जातील. विद्यापीठाकडून अहवाल मागवला जाणार आहे. त्यानंतरच या प्रकरणात योग्य निर्णय घेतला जाईल असे सांगितले. दरम्यान या प्रकरणात दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणातर्फे खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. प्राधिकरणाच्या मडगाव येथील मासळीबाजार हा या दृष्टीने फार मोठा बाजार आहे. त्यामुळे प्राधिकरणाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश खंडपीठाने दिला होता. पुढील सुनावणी १० डिसेंबर रोजी होणार आहे. 

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टgoaगोवा