शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

युरोपात प्रवेश मिळविण्यासाठी गोंयकार धरताहेत पोर्तुगालची वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 22:06 IST

पोर्तुगीज पासपोर्टमुळे युरोपची दारे खुली होत असल्याने कित्येक गोमंतकीयांसाठी हे पासपोर्ट सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरल्याने मोठ्या प्रमाणावर गोमंतकीयांनी स्वत:ला पोर्तुगालचे नागरिक होण्याचा मार्ग पत्करला आहे.

 - सुशांत कुंकळयेकर 

मडगाव -  पोर्तुगीज पासपोर्टमुळे युरोपची दारे खुली होत असल्याने कित्येक गोमंतकीयांसाठी हे पासपोर्ट सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरल्याने मोठ्या प्रमाणावर गोमंतकीयांनी स्वत:ला पोर्तुगालचे नागरिक होण्याचा मार्ग पत्करला आहे. गोव्यात पोर्तुगीज पासपोर्टधारक नेमके किती आहेत याची आकडेवारी कुणाकडेही नक्की मिळत नाही. असे जरी असले तरी हा आकडा निश्चित लाखोंच्या घरात असणार असे सांगण्यात येते.

पूर्वाश्रमीच्या पोर्तुगीज कॉलनीतल्या नागरिकांच्या वंशजांना पोर्तुगीज नागरिकत्व घेता येते, अशी तरतूद पोर्तुगालच्या घटनेत असल्याने त्याचा फायदा केवळ गोमंतकीयांनीच उचलला आहे.  असे नव्हे तर पूर्वी गोव्यात समाविष्ट असलेले दमण व दीव हे आताचे संघप्रदेश हेही एकेकाळी पोर्तुगाली कॉलनीचा भाग असल्याने मोठ्या प्रमाणावर गुजराती नागरिकांनीही या सुविधेचा लाभ उठविला आहे. त्यामुळे पोर्तुगीज पासपोर्टधारक नेमके गोमंतकीय किती आणखी परराज्यांतील नागरीक किती याचाही तपशील कुठल्याही यंत्रणेकडे नाही. असे जरी असले तरी प्रत्येक वर्षी किमान दोन हजार लोकांची या पोर्तुगीज पासपोर्ट धारकांमध्ये  भर पडते असे सांगण्यात येते.

मध्यंतरी पोर्तुगीज पासपोर्टच्या या प्रश्र्नाने गोव्याच्या राजकारणातही धुमाकूळ घातला होता. दक्षिण गोव्यातील बाणावली या विधानसभा मतदारसंघाचे आमदार कायतान सिल्वा हे पोर्तुगीज पासपोर्टधारक असल्याने त्यांचे भारतीय नागरिकत्व केंद्रीय गृहमंत्र्यालयाकडून रद्दही करण्यात आले होते. त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात आली होती. मात्र या प्रश्र्नावरुन सिल्वा यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढत देऊन आपली आमदारकी शाबूत ठेवली होती. केवळ सिल्वा हेच नव्हे तर उत्तर गोव्यातील हळदोणा मतदारसंघाचे आमदार ग्लेन टिकलो हेही पोर्तुगीज नागरीक असल्याचा दावा करुन त्यांच्याही आमदारकीला आव्हान देण्यात आले होते. हा प्रश्र्न केवळ राजकारण्यांपुरता मर्यादित नव्हता तर कित्येक उद्योजक आणि कलाकारांनीही ही सवलत घेतल्याने गोव्यातील मतदार यादीतून त्यांची नावे रद्द करावीत यासाठी अर्जही करण्यात आले होते. गोव्याचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पॉप गायक रेमो फर्नांडिस हे पोर्तुगीज नागरीक असूनही गोव्यात त्यांची विधानसभा निवडणुकीचे मतदार आयकॉन म्हणून निवड केल्यामुळे हेही प्रकरण काही वर्षापूर्वी गोव्यात बरेच गाजले होते.

गोवा पोलिसांच्या विदेश विभागाचे अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांच्याशी यासंबंधीची आकडेवारी मागितली असता, गोवा पोलिसांकडे केवळ पोर्तुगीज व्हिसासाठी  जे अर्ज करतात त्यांचीच माहिती येत असल्यामुळे गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट धारकांचा नेमका आकडा किती हे नक्की कळणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. गोवा पोलिसांकडे नक्की आकडेवारी उपलब्ध नसली तरी पणजीतील पोर्तुगीज दुतावासाच्या दारात दररोज ३00 ते ४00 लोकांची रांग लागलेली असते. यातील प्रत्येकजण पोर्तुगीज पासपोर्ट मिळविण्यासाठीच येत आहेत असे जरी नसले तरी बहुतेकजण याच कामासाठी आलेले असल्याने गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट धारकांच्या आकड्याने नक्कीच एक लाखाची संख्या ओलांडल्याची शक्यता संबंधित सुत्राकडून व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :goaगोवाIndiaभारत