शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

जर्मन नागरिकांकडून हरमल येथे ६४ लाखांचे एलएसडी ड्रग्स जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 19:27 IST

म्हापसा : नवीन पर्यटन हंगामा सुरू झाल्यापासून तसेच मावळत्या वर्षातील अमली पदार्था विरोधात केलेल्या पेडणे पोलिसांनी केलेल्या सर्वात मोठ्या कारवाईत हरमल येथील किना-यावर दोन जर्मन विदेशी नागरिकांकडून ६४ लाख रुपयांचे एलएसडी ड्रग्स जप्त केला

म्हापसा : नवीन पर्यटन हंगामा सुरू झाल्यापासून तसेच मावळत्या वर्षातील अमली पदार्था विरोधात केलेल्या पेडणे पोलिसांनी केलेल्या सर्वात मोठ्या कारवाईत हरमल येथील किना-यावर दोन जर्मन विदेशी नागरिकांकडून ६४ लाख रुपयांचे एलएसडी ड्रग्स जप्त केला आहे.पेडणे पोलिसांनी १२ रोजी रात्री हरमल येथील ओझिल गेस्ट हाऊस येथे राहणा-या सर्गीस व्हिक्टर मानका (३१), स्टॅनी मुलर सेबॅस्तीयान (२५) या जर्मन नागरिकांकडून ६४ ग्रॅम एलएसडी ड्रग्स जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ६४ लाख रुपये होते. कारवाई मंगळवारी पहाटे करण्यात आली.पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांनी माहिती देताना मागच्या चार दिवसापासून संशयीताकडे मोठ्या किमतीचा ड्रग्स आहे, अशी माहिती त्यांना मिळाली होती. मात्र त्या दोघांनी सी फॉर्म भरले नसल्याने ते नेमके कोणत्या गेस्ट हाऊसमध्ये उतरले आहेत याची माहिती मिळत नव्हती. पेडणे पोलीस कॉन्स्टेबल प्रेमनाथ सावळदेसाई यांनी दोघांचीही पूर्ण माहिती गोळा केली नंतर ही कारवाई करण्यात आली.संशयित कोठे राहतात याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर, उपनिरीक्षक सागर धाटकर, प्रसाद तुयेकर, प्रेमनाथ सावळदेसाई, संदीप गावडे, स्वप्नील शिरोडकर, अनिलकुमार पोळे, फोंडू गावस, शैलेश पार्सेकर, योगेश गावकर व ओमप्रकाश पाळळी या पथकाने सापळा रचून दोघांनाही रंगेहाथ पकडले. पोलिसांनी पंचासहीत झडती घेतली असता त्यांच्याकडे ६४ लाखाचा ड्रग्स सापडला. त्याशिवाय रोख रुपये २७५०० आयफोन व सॅमसंग मोबाइल जप्त करण्यात आले. पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कायद्यातील विविध कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे.पेडणे पोलिसांनी या वर्षात एकूण १३ ड्रग्स गुन्हे नोंद केले असून पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली एकूण ३ गुन्हे नोंदवले. पेडणे पोलिसांच्या इतिहासात ही सर्वात मोठी कारवाई आहे. दोघे जर्मन हरमल येथील ओझिल गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्य करून होते. त्याचे सी फॉर्म न भरल्याने घर मालकावर गुन्हा नोंदवला जाणार असल्याचे चोडणकर म्हणाले.

टॅग्स :goaगोवा