शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी सढळ हस्ते मदत; निर्मला सीतारामन यांची CM प्रमोद सावंतांना ग्वाही

By किशोर कुबल | Updated: August 25, 2023 13:54 IST

कॅसिनोंमधील बेटिंगवर २८ टक्के करावर फेरविचाराची मुख्यमंत्र्यांची मागणी.

किशोर कुबल, पणजी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन राज्यातील विकासकामांबाबत सखोल चर्चा केली. राज्यात होणार असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना सढळ हस्ते मदत करण्याचे आश्वासन सीतारामन यांनी दिले. कॅसिनोंमधील बेटिंगवर २८ टक्के कर लागू करण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याचीही मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.

मुख्यमंत्री गुरुवारी रात्री दिल्लीत दाखल झाले असून केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री तसेच इतर केंद्रीय मंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट ते घेणार आहेत. गोव्यात होणार असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी जोरदार तयारी सुरु आहे. आवश्यक पायाभूत सुविधा निर्धारित कालावधीत तयार केल्या जातील. सर्व स्टेडियम्सच्या नूतनीकरणासाठी ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते उद्घाटन समारंभ येत्या २५ ऑक्टोबर रोजी नियोजित आहे, तर समारोप समारंभ ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.दरम्यान, ऑनलाइन गेमिंगमधील बेट्सच्या पूर्ण दर्शनी मूल्यावर २८  टक्के कर लावण्याचा जीएसटी कौन्सिलचा निर्णय गोव्यातील कॅसिनो उद्योगांच्या मुळावर आलेला आहे. कॅसिनो बंद पडल्यास सरकारला वार्षीक ५०० कोटी रुपयांहून अधिक महसुलास मुकावे लागेल ही चिंता राज्य सरकारला आहे.जीएसटी कौन्सिलमध्ये राज्याचे प्रतिनिधी असलेले गोव्याचे उद्योगमंत्री मॅावीन गुदिन्हो यानी या मागणीवर केंद्राने फेरविचार करावा, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी सीतारामन यांचे याकडे लक्ष वेधले. २८ टक्के कराचा पुनर्विचार करण्याची मागणी त्यांनी केली. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनnirmala sitharamanनिर्मला सीतारामन