शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

गौरव बिद्रेचा सुटण्याचा खटाटोप पुन्हा फसला, गौरी आचार्य खून प्रकरणात जामीन फेटाळला

By वासुदेव.पागी | Updated: November 6, 2023 16:29 IST

गौरव बिद्रेने एकतर्फी प्रेमातून प्रा. गौरी आचार्य हिचा गळा आवळून खून केला होता. या खून प्रकरणी सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्षाचा मुलगा गौरव प्रकाश बिद्रेला गोव्यात अटक करण्यात आली होती.

पणजी : प्राध्यापिका गौरी आचार्य हिच्या  खून प्रकरणात जीम ट्रेनर गौरव बिद्रेला पुन्हा एकदा उच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे. गौरवचे असलेले इतर युवतींशी संबंध आणि तो गोव्यातून पळून जाण्याची असलेली शक्यता लक्षात घेऊन त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

गौरव बिद्रेने एकतर्फी प्रेमातून प्रा. गौरी आचार्य हिचा गळा आवळून खून केला होता. या खून प्रकरणी सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्षाचा मुलगा गौरव प्रकाश बिद्रेला गोव्यात अटक करण्यात आली होती. आरोपी गौरवने आपणच गौरीचा गळा आवळून खून केल्याची कबुलीही दिली होती आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवून जुने गोवा पोलिसांनी आरोपपत्रही दाखल केले आहे.

आरोपपत्र दाखल केल्यानंतर  गौरव जामीनवर सुटण्यासाठी सातत्याने आटापीटा करीत आहे. सत्र न्यायायापासून उच्च न्यायालयापर्यंत यापूर्वीही त्याने धाव घेतली होती. परंतु त्याच्या गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेऊन तसेच त्याला जामीन मंजूर केल्यास तो पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन अर्ज फेटाळण्यात आले आहेत. शिवाय पोलिसांनी सादर केलेले कागदोपत्री पुरावेही गौरवच्या विरोधात गेले आहेत. गौरवचे अनेक युवतींशी संबंध असल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आहे. खंडपीठाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्याचा आणखी एक प्रयत्न फसला आहे. 

गौरव हा ओल्ड गोवा येथे एका जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करत होता. त्या दरम्यान खांडोळा कॉलेजमध्ये असणाऱ्या प्राध्यापिका गौरी बरोबर त्याची ओळख झाली होती. त्या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले होते. मात्र गौरी त्याच्यापासून दूर राहणे पसंत करू लागल्यामुळे त्याने तिचा काटा काढला असा आतापर्यंतच्या तपासाचा निष्ष्कर्श आहे. 

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी