शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

गँगरेप प्रकरण : संशयिताच्या मोबाईलवरील व्हॉईस सँपल पृथ्थकरणासाठी चंदीगढला पाठविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 19:51 IST

महिन्याभरापूर्वी गोव्यात खळबळ माजवून देणा-या बेताळभाटी येथील गँगरेप प्रकरणात संशयिताचे मोबाईलवरुन संभाषण पृथ्थकरणासाठी चंदीगढ येथे पाठवून देण्यात आले आहे.

-सूरज पवार

मडगाव -  महिन्याभरापूर्वी गोव्यात खळबळ माजवून देणा-या बेताळभाटी येथील गँगरेप प्रकरणात संशयिताचे मोबाईलवरुन संभाषण पृथ्थकरणासाठी चंदीगढ येथे पाठवून देण्यात आले आहे. सीएफएसएल चंदीगड येथे प्रयोगशाळेत या व्हॉईस सँपलची तपासणी होणार आहे. पोलिसांचे एक पथक चंदिगडला रवाना झाले आहे. दरम्यान, संशयिताच्या डीएनए चाचणीचे नमुने तेथे प्रयोगशाळेत पाठवून देण्यात आले असून, पोलिसांचे एक पथक हैदराबाद येथे रवाना झाले आहे. या गँगरेप प्रकरणात संशयितावर लवकरच आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील बेताळभाटी येथील सनसेट बीचवर गँगरेपची ही घटना 23 मे रोजी घडली होती. मध्यप्रदेशातील इंदुर येथील तिघा पर्यटकांनी एका युवतीवर बलात्कार करुन नंतर त्या युवतीसह तिच्या मित्रचे कपडे उतरवून नग्नावस्थेत त्यांची मोबाईलवरुन छायाचित्रे काढली होती. फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली होती. मागाहून त्या युवतीने गोव्यातील कोलवा पोलीस ठाण्यात यासंबधी रितसर तक्रार नोंदविली होती. संशयितांनी त्या युवतीच्या मित्रला खंडणीसाठी मोबाईलवरुन कॉल केला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा कौशल्यरित्या तपास करताना  ईश्वर मकवाना, संजय पाल व राम संतोष भारिया या तिघांना अटक केली होती. सदया संशयितांची गोव्यातील कोलवाळ तुरुगांत रवानगी करण्यात आली आहे. ईश्वर मकवाना हा कुविख्यात गुन्हेगार असल्याचे मागाहून उघड झाले होते. इंदुर येथे त्याच्यावर गँगरेप, खंडणी, दुहेरी खून असे गुन्हे नोंद आहेत. ईश्वर वापर असलेले मोबाईल संच चोरीचे असून, इंदुर पोलीस ठाण्यात यासबंधी तक्रारही नोंद आहे.

टॅग्स :crimeगुन्हेgoaगोवा