शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे पोस्टमनकाका कारमधून आल्यास नवल नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 19:52 IST

प्रस्ताव टपाल खात्याचा विचाराधीन

- वासुदेव पागी

पणजी : खाकी वेशातील पोस्टमन सायकलवरून येऊन पत्रे देऊन जाताना पाहिले आहे. आता सायकल गेली आणि स्कुटर आली. स्कूटरसाठी पेट्रोल भत्ता तेवढा पोस्टमनला दिला जातो. यापुढे मोठ्या शहरात चारचाकी वाहन देण्याचाही पोस्ट खात्याचा विचार आहे. अर्थात ही गाडी तीन किंवा चार पोस्टमनसाठी एक असेल. 

देशातील मोठ्या शहरात ज्या ठिकाणी पत्र व्यवहार अधिक असतात आणि लोकवस्तीही मोठ्या प्रमाणावर असते त्या ठिकाणी पत्रे वितरीत करण्यासाठी भविष्यात पोस्टमन कार घेऊन गेलेले दिसले तर आश्चर्य वाटण्यासारखे नसणार. कारण या प्रस्तावावर टपाल खाते गांभिर्याने विचार करीत आहे. गोव्याचे पोस्टमास्टर जनरल विनोद कुमार यांनी लोकमतशी बोलताना याची माहिती दिली. अर्थात तीन किंवा चार पोस्टमनसाठी ही गाडी असेल असे ते म्हणाले. 

पत्रातून आता कौटुंबिक किंवा मित्रांच्या संवादाची भाषा जात नाही. म्हणून काही टपाल खात्याचा कामाचा भार हलका झालेला नाही आणि टपाल खात्याची कामेही कमी झालेली नाहीत. उलट  नोटिसा, नोकरीसाठी पत्रे, सरकारी आदेश व इतर स्वरूपाची पत्रे खूप वाढली आहेत. ऑनलाईन शॉपिंग सारख्या व्यवहारातही उत्पादने पुरविण्याचे काम अॅमेझॉन सारख्या मोठ्या एजन्सी टपालखात्याला मोठ्या प्रमाणात देतात. शिवाय टपाल खात्याने कामाचा विस्तारही वाढविला असल्याचे त्यांनी सांगितले. 

केवळ टपालापुरते मर्यादीत न राहता बँकींग, विमा या सारखे व्यवहार टपाल खाते करीत आहे व त्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. केवळ गोव्या सारख्या लहान राज्यातही ४ लाखांहून अधिक खाती असल्याची माहिती त्यांनी दिली. गोव्यात टपाल खात्याचे १० टक्के संगणकीकरण करण्यात आले आहे. तसेच नेटवर्कतर्फे सर्व टपाल कचेऱ्या जोडण्यात आल्या आहेत. राज्यात १०४ मुख्य टपाल कचेऱ्या १५३ शाखा कचेऱ्या मिळून २५७ टपाल कचेऱ्या आहेत. राज्यात ५०० हून अधिक टपाल खात्याचे कर्मचारी तर ४०० हून अधिक ग्राम डाक सेवक आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसcarकार