शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मराठीतून आरंभ, कोंकणीतून शेवट; आमदार शपथबद्ध, विरोधकही उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 20:07 IST

चार आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न

पणजी : आमदारांच्या शपथविधीचा सोहळा पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पात मंगळवारी वेगळ्य़ाच वातावरणात पार पडला. मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी प्रारंभीच मराठी भाषेत आमदारकीची शपथ घेतली आणि सर्वात शेवटी म्हणजे चौथ्या क्रमांकावर सुभाष शिरोडकर यांनी कोंकणीतून शपथ घेत सोहळ्याची सांगता केली.म्हापशाचे तरुण आमदार जोशुआ डिसोझा यांनी अपेक्षेप्रमाणो इंग्रजीतून शपथ घेतली. पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनीही इंग्रजीतच शपथ घेतली. शपथ घेण्यासाठी सर्वप्रथम आमदार सोपटे यांचे नाव पुकारले गेले. सभापती मायकल लोबो यांनी सोपटे यांना पद व अधिकाराची शपथ दिली. भाजपच्या तिकीटावर सोपटे प्रथमच मांद्रेचे नेतृत्व करत आहेत. पूर्वी त्यांनी भाजपतर्फे पेडणो मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. मग त्यांनी काँग्रेसतर्फे मांद्रेचे नेतृत्व केले. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व त्यांच्या समर्थकांचा विरोध असून देखील सोपटे यांनी मोठी आघाडी प्राप्त करत विजय प्राप्त केला. याविषयी भाजपमध्येही आनंदाची भावना आहे. सोपटे यांनी शपथ घेतल्यानंतर जोशुआ यांचे नाव पुकारले गेले. मग मोन्सेरात यांचे नाव घेतले गेले. सर्वात शेवटी शिरोडकर यांनी शपथ घेतली. एरव्ही अनेकदा शिरोडकर यांनी राजभवनवर मंत्रीपदाची शपथ घेताना ती इंग्रजीतून घेतलेली आहे. यावेळी मात्र त्यांनी मातृभाषा कोंकणीतून शपथ घेत कार्यक्रमाचा समारोप केला.यावेळी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर हेही उपस्थित राहिले. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि मंत्री रोहन खंवटे, मिलिंद नाईक हेही उपस्थित राहिले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. शपथ घेणा:यांमध्ये एकमेव काँग्रेस आमदार होते.  पंचवीस वर्षात प्रथमच काँग्रेसने पणजीची जागा जिंकली. बाबूश मोन्सेरात यांनी शपथविधी सोहळ्य़ानंतर लगेच मुख्यमंत्री सावंत यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.