शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत फ्रीस्टाइल हाणामारी दोघांच्या मारहाणीत चार जखमी

By आप्पा बुवा | Updated: July 28, 2023 20:14 IST

या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

अप्पा बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: मागच्या काही महिन्यात भूमिगत झालेली गुन्हेगारी वृत्ती फोंड्यात पुन्हा डोके वर काढते की काय अशी परिस्थिती निर्माण होत असून, शिरोडा येथे दारूच्या नशेत दोघांनी चार युवकांना मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. मागच्या महिन्यात गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला मारहाण केल्यानंतरचीही दुसरी घटना होय.

गुरुवारी रात्री झालेल्या मारहाणीची फोंडा पोलिसांनी लगेचच दखल घेतली असून काराय - शिरोडा येथे  दारूच्या नशेत ४ जणांना मारहाण केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी अक्षय रमेश नाईक व रवीकुमार काळू गोसावी (पंडेगाळ- शिरोडा) याना अटक केली आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेले शोधन नाईक याच्यावर इस्पितळात उपचार सुरू असून कार्तिक नाईक, जयेश नाईक व सुजय नाईक या जखमीवर उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. 

फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काराय येथे एका दारूच्या दुकानाबाहेर गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दोन गटात शिल्लक कारणावरून अगोदर वादावादी झाली. वादावादीचे पर्यावरण लगेचच मारामारीत झाले. संशयियांनी नंतर चार युवकांना बेदमपणे मारहाण केली. यात ४ जण जखमी झाले. जखमींना उपचारसाठी अगोदर शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यापैकी गंभीर जखमी झालेल्या शोधन नाईक याला अधिक उपचारासाठी मडगाव येथील इस्पितळात दाखल करण्यात आले. फोंडा पोलिसांनी संशयितांना अटक केली असून निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य नाईक गावकर या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी