शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
2
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
3
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
4
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
5
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
6
Adah Sharma : अदा शर्माचं शिक्षण किती?, जगतेय आलिशान आयुष्य; कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, नेटवर्थ
7
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
8
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
9
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
10
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
11
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
12
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
13
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
14
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
15
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
16
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
17
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
18
अत्यंत प्रतिकूल काळात सनातन वैदिक हिंदू धर्माचे रक्षण करणारे आद्य शंकराचार्य यांची जयंती; वाचा कार्य!
19
Lucky Sign: 'ही' चिन्ह दिसू लागली की समजून जा, वाईट काळ संपून 'अच्छे दिन' येणार!
20
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं

गोव्यात घराणेशाहीची लढत, चार जोडपी, कन्या व वडीलही रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 7:57 AM

विधानसभेच्या एकूण ४० जागा आहेत. येत्या १४ फेब्रुवारी रोजी मतदान होईल. घराणेशाहीविरुद्ध कायम बोलणाऱ्या भाजपने मंत्री विश्वजित राणे व त्यांच्या पत्नी दिव्या राणे यांना तिकीट दिले

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात यावेळी एकूण चार जोडपी उतरलेली आहेत. चारपैकी दोन जोडपी सत्ताधारी भाजपनेच रिंगणात उतरविली आहेत. या शिवाय कन्या व वडील तसेच दोन बंधू आपले भवितव्य अजमावत आहेत.

विधानसभेच्या एकूण ४० जागा आहेत. येत्या १४ फेब्रुवारी रोजी मतदान होईल. घराणेशाहीविरुद्ध कायम बोलणाऱ्या भाजपने मंत्री विश्वजित राणे व त्यांच्या पत्नी दिव्या राणे यांना तिकीट दिले. दिव्या आयुष्यातील पहिली विधानसभा निवडणूक लढवत आहे. त्यांच्याविरुद्ध त्यांचे सासरे व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना काँग्रेसने तिकीट दिले होते; पण त्यांनी माघार घेतली. यामुळे सूनविरुद्ध सासरे अशी लढत टळली.महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात आणि त्यांचे आमदार पती बाबूश मोन्सेरात या दोघांनाही भाजपने तिकीट जाहीर केले आहे.  उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेतच. शिवाय त्यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांनीदेखील निवडणुकीच्या रिंगणात उडी टाकली आहे. पत्नी सावित्री हिला मात्र भाजपने तिकीट दिले नाही, फक्त पती बाबू कवळेकर यांनाच दिले.

माजी मंत्री मायकल लोबो आणि त्यांच्या पत्नी डिलेयला लोबो यांनीही भाजपकडे तिकीट मागितले होते. भाजपने त्यांना तिकीट नाकारले. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने लोबो पती-पत्नीला तिकीट दिले आहे. माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव हे बाणावली मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर लढत आहेत तर त्यांची कन्या वालंका नावेलीतून तृणमूलच्याच तिकीटावर रिंगणात उतरल्या आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री दीपक ढवळीकर हे प्रियोळ मतदारसंघातून लढत आहेत तर त्यांचे बंधू व ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर हे मडकई मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. चार जोडपी यावेळी रिंगणात उतरली हा गोव्यात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपचे आमदार पांडुरंग मडकईकर हे यावेळी स्वत: लढत नाहीत पण त्यांनी त्यांच्या पत्नी जेनिता यांना भाजपचे तिकीट मिळवून देण्यात यश मिळवले आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाGoa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२