शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पणजी महापालिकेला 890 कोटी द्या; माजी महापौरांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 3:18 PM

माजी महापौर सुरेंद्र फुर्तादोंची वित्त आयोगाकडे मागणी

पणजी : महापालिका क्षेत्रातील विकासकामे, कचरा व्यवस्थापन तसेच आपत्कालीन व्यवस्थापन आदींसाठी माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी पंधराव्या वित्त आयोगाकडे ८९० कोटी रुपये मंजूर करण्याची मागणी केली आहे.आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंह यांना सादर केलेल्या निवेदनात फुर्तादो यांनी महापालिका कार्यक्षेत्रातील अनेक विषयांना स्पर्श करताना काही ठळक मुद्दे मांडले आहेत. वारसा वास्तूंच्या संवर्धनासाठी ३०० कोटी रुपये, वादळ, पूर आदी नैसर्गिक आपत्तीवेळी संकटग्रस्तांना आर्थिक दिलासा तसेच नैसर्गिक आपत्ती विषयी पूर्वसूचना देणारी यंत्रणा उभी करण्यासाठी २५० कोटी रुपये, महापालिका कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर कामांसाठी ९० कोटी रुपये  द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.फुर्तादो म्हणाले की, १४ व्या वित्त आयोगाकडे आपण १२९० कोटी रुपये मागितले होते. त्यावेळी मी महापौर होतो. आणि आयोगाने केवळ ४ कोटी रुपये मंजूर केले होते. २०१४ साली आयोगाला निवेदन सादर केले त्यात शहरासाठी आवश्यक सर्व मुद्दे उपस्थित केले होते. आयोगाने महापालिकेच्या सर्व नगरसेवकांना बोलावून घेऊन त्यांचे म्हणणे ऐकावे. महापौर, आयुक्तांनीही नगरसेवकांचे काय म्हणणे आहे हे आयोगासमोर सादरीकरण करण्यापूर्वी ऐकून घ्यायला हवे. तसे काही घडले नाही, त्यामुळे मला स्वतंत्रपणे पंधराव्या वित्त आयोगासमोर निवेदन सादर करावे लागले.निवेदनात फर्तादो म्हणतात की, पणजीत तशी झोपडपट्टी नाही, परंतु झोपडपट्टीसदृश्य विभाग आहेत. तेथे पायाभूत सुविधांचा दर्जा वाढवणे आवश्यक आहे. झोपडपट्टी पुनर्विकास कार्यक्रमांतर्गत उपाय योजना होणे गरजेचे आहे. राजधानी पणजी शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत तसेच सांस्कृतिक आणि वास्तुरचनेच्या दृष्टिकोनातून महत्त्व असलेल्या पुरातन वास्तूही आहेत, या वास्तूंचे संवर्धन व्हायला हवे. संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, शास्त्रीय आणि सांस्कृतिक संघटनेने पणजीतील या वस्तूंची दखल घेतली आहे. जागतिक वारसा शहर म्हणून पणजीची गणना झालेली आहे.घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात कामगार काम करीत आहेत परंतु त्यांच्या वेतनाच्या बाबतीत समस्या आहे त्यांना सेवेत कायम करणे आवश्यक आहे. फुर्तादो यांनी निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच यांनाही सादर केल्या आहेत.