शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

'ड्रग्स प्रकरणात एसआयटी करणार माजी गृहमंत्र्यांची चौकशी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 21:30 IST

ड्रग्स माफिया व पोलीस यांच्यातील कथित संबध प्रकरणात माजी गृहमंत्री रवी नाईक यांचीही चौकशी होण्याची शक्यता असून एसआयटीकडून त्यांनाही समन्स जाणार आहेत. यापूर्वी त्यांचे पुत्र रॉय नाईक यांची चौकशी करुन जबानी नोंदवून घेण्यात आली होती.

पणजी: ड्रग्स माफिया व पोलीस यांच्यातील कथित संबध प्रकरणात माजी गृहमंत्री रवी नाईक यांचीही चौकशी होण्याची शक्यता असून एसआयटीकडून त्यांनाही समन्स जाणार आहेत. यापूर्वी त्यांचे पुत्र रॉय नाईक यांची चौकशी करुन जबानी नोंदवून घेण्यात आली होती. रॉय नाईक यांच्या चौकशीनंतर या प्रकरणाशी संबंधित आणखी काही जणांना एसआयटीकडून समन्स पाठविण्यात आले होते. त्यांची चौकशी करुन जबानीही नोंदवून घेण्यात आली आहे. या प्रकरणातील प्राथमिक चौकशीत काही तथ्य आढळून आल्यास या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यापूर्वी माजी गृहमंत्री रवी नाईक यांची चौकशी केली जाणार आहे अशी माहिती एसआयटीच्या सूत्रांकूडन देण्यात आली. इस्रायली नागरीक दुदू याला अंमली पदार्थांसह अटक करण्यात आल्यानंतर २००८ मध्ये अंमली पदार्थ लॉबी व पोलिसांचे संबंध उघडकीस आले होते. तर काही पोलिसांना आणि ड्रग्स एजंटनाही अटक करण्यात आली होती. हे प्रकरण सीबीआयकडेही देण्यात आले होते, तसेच २०१२ मध्ये गोव्यात भाजपचे सरकार आल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आमदार मिकी पाशेका यांच्या अध्यक्षतेखाली गोवा विधानसभेची सभागृह समितीही नियुक्त करण्यात आली होती. या समितीने चौकशी करुन २०१३ मध्ये सादर केलेल्या अहवालात रॉय नाईक यांचा संबंध ड्रग्स लॉबीशी असल्याचा निष्कर्ष लावला. परंतु, भाजप सरकारमधीलच दोन आमदार व या सभागृह समितीचे सदस्य विष्णू वाघ आणि मायकल लोबो यांनी हा अहवाल स्विकारला नव्हता. त्यावर स्वाक्षरी करण्यास त्यांनी नकार दिला. त्यानंतर हा अहवाल क्राईम ब्रँचच्या स्वाधीन करून चौकशीचा आदेश सरकारने दिला होता. 

टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालयgoaगोवा