शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून माजी नगरसेवकाचा पुत्र ठार

By किशोर कुबल | Updated: January 1, 2024 12:49 IST

स्मार्ट सिटीच्या बेजबाबदारपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

किशोर कुबल, पणजी : स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून रायबंदर येथील आयुष हळर्णकर (२१) हा युवक ठार झाला. रॉयल एनिफल्ड बुलेट मोटरसायकलने तो पहाटे घरी परतत असताना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आज पहाटे ३.३० च्या सुमारास मळा येथे ही दुर्घटना घडली. स्मार्ट सिटीच्या बेजबाबदारपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आयुष हा माजी नगरसेवक रुपेश हळर्णकर यांचा पुत्र होय. खोदकाम केलेल्या ठिकाणी बॅरिकेडस घातले नव्हते तसेच तेथे विजेचे दिवे पेटत नसल्याने आयुष याला खड्ड्याचा अंदाज आला नसावा व तो बुलेटसह थेट खड्डयात कोसळला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यासाठी ‘स्मार्ट सिटी’ने शहरात ठिकठिकाणी रस्ते खोदलेले आहेत. परंतु सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. मळा येथील या भागात गेले दहा दिवस पथदीप पेटत नव्हते. ते दुरुस्त करण्याची तसदी कोणी घेतली नाही. तसेच खोदकामाच्या ठिकाणी दुर्घटना घडू नये यासाठी बॅरिकेडसही घातले नाहीत. रेडियमच्या पट्ट्याही लावल्या नाहीत. अपघात घडल्यानंतर तेथे पत्र्यांचे आश्चादन लावण्यात आल्याचे बोलले जात आहे.स्मार्ट सिटीचा दुसरा बळी

स्मार्ट सिटीच्या कामांमुळे याआधी रायबंदर येथे मजुराचा बळी गेला होता. अंगावर मातीचा ढिगारा पडल्याने गाडला जाऊन मजूर ठार झाला होता. त्यानंतर हा दुसरा बळी ठरला आहे. स्मार्ट सिटीच्या खड्ड्यांमुळे शहरात किमान अकरा ट्रक कलंडण्याच्या किंवा रुतण्याच्या घटना घडलेल्या आहेत. बुलेट मोटरसायकल ज्या पध्दतीने खड्डयात कोसळलेली दिसत आहे ती पाहता तेथे लावलेल्या लाकडी फळ्यांवर तो जबरदस्त आदळलेला असावा व ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज आहे. 

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात