शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्थापन; प्रदेशाध्यक्षपदी शंभू मधुकर परब

By किशोर कुबल | Updated: October 3, 2023 15:18 IST

राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काल नियुक्तीचा आदेश काढला.

पणजी : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट गोव्यात स्थापन झाला असून प्रदेशाध्यक्षपदी शंभू मधुकर परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काल नियुक्तीचा आदेश काढला. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर गोव्यात काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी गोव्यात पक्ष एकसंध असल्याचा दावा करून सर्वजण शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले होते.

गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून आलबेल नव्हतेच. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पक्षाच्या कोणत्याही हालचाली दिसत नव्हत्या. फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने अकरा उमेदवार उभे केले परंतु एकालाही विजयी प्राप्त करता आला नाही. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर गोव्यात पक्षाचे काम पूर्णपणे थंडावले होते. या पार्श्वभूमीवर अजित पवार गट गोव्यात दाखल झाल्याने आता राजकारणाला नवी गती येईल.

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा  यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'शंभू परब हे राष्ट्रवादीच्या कार्यालयात कारकून म्हणून काम करत होते. प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना अध्यक्ष बनवले, त्यामुळे त्यांचे कौतुकच करावे लागेल. मी शरद पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष असून शंभू यांच्या नियुक्तीबद्दल मला फारसे काही बोलायचे नाही. माझी नियुक्ती शरद पवार यांनी अध्यक्ष म्हणून केलेली आहे आणि आमचे काम चालू आहे. गुरुवारी शरद पवार यांनी सर्व प्रदेशाध्यक्ष, पक्षाचे खासदार, आमदार यांची दिल्लीत बैठक बोलावली असून या बैठकीसाठी मी दिल्लीला जाणार आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारgoaगोवाNCPराष्ट्रवादी काँग्रेस