शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

फॉर्मेलिनप्रश्नी त्या अहवालाच्या सखोल चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 16:22 IST

आरोग्य खात्याच्या अतिरिक्त सचिवांकडून ही चौकशी होणार आहे.

पणजी : काही महिन्यांपूर्वी सर्वप्रथम जेव्हा अन्न व औषध प्रशासन खात्याच्या (एफडीए) अधिकारी आयवा फर्नांडिस यांनी मडगावला माशांची तपासणी करून माशांमध्ये फॉर्मेलिन रसायन असल्याचा अहवाल दिला होता, त्या अहवालाच्यादृष्टीने पूर्ण विषयाची चौकशी करण्याचे सरकारने ठरवले आहे. आरोग्य खात्याच्या अतिरिक्त सचिवांकडून ही चौकशी होणार आहे.

आरोग्य खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांना पत्रकारांनी शनिवारी आयवा फर्नांडिस यांच्या अहवालाविषयी विचारले. त्यावेळी मंत्री राणे म्हणाले, की माशांमध्ये फॉर्मेलिन नाही एवढे मी सांगू शकतो. गेले काही महिने अनेक चाचण्या केल्या गेल्या. मासळी बाजारातही रोज एफडीएचे अधिकारी जातात व माशांची अगदी शास्त्रोक्त पद्धतीने चाचणी केली जाते. फॉर्मेलिन आढळलेले नाही. एफडीएच्या विद्यमान संचालक ज्योती सरदेसाई यांचाही अहवाल अगदी स्पष्ट आहे. त्यांच्यावर माझा विश्वास आहे. 

मंत्री राणे म्हणाले, की आयवा फर्नांडिस यांनी प्रारंभी जो अहवाल दिला, त्याची चौकशी सरकार करून घेईल. आरोग्य खात्याच्या सचिवांनी त्यासाठी माझ्याकडे फाईल पाठवली आहे. अतिरिक्त सचिवांनी चौकशी केल्यानंतर सत्य काय ते बाहेर येईल. योग्य ती कारवाई सरकार करील. गोव्यात जी मासळी येत आहे, त्या मासळीमध्ये फॉर्मेलिन नाही, आम्ही विविध प्रकारे चाचण्या करून घेतल्या आहेत. एफडीएकडे सर्व मासळीवाहू ट्रकांनी स्वत:ची नोंदणी करून घ्यावी, असे आम्ही यापूर्वी सांगितले आहे. आणखी दि. 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली जाईल. तोपर्यंत ट्रकांना नोंदणी करावीच लागेल. 

काँग्रेसने चर्चेस यावे राणे म्हणाले, की माशांमध्ये फॉर्मेलिन आहे असे सांगून काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर आदी गोव्यातील लोकांमध्ये पुन्हा भीती निर्माण करत आहेत. चोडणकर किंवा अन्य काँग्रेस नेत्यांनी चर्चेसाठी यावे असे मी आव्हान देतो. मी खुल्या चर्चेसाठी तयार आहे. गिरीश काही तज्ज्ञ नव्हे. मी त्यांना तुम्ही स्वत: माझ्यासोबत मासळीची तपासणी करण्यासाठी या असेही आव्हान देतो. एफडीएचे अधिकारी तसेच काँग्रेस नेते व आम्ही एकत्र कुठच्याही मासळी बाजारात मासे तपासणीसाठी जाऊया. मी दिल्लीहून तज्ज्ञांना बोलावतो. जाहीरपणे माशांची चाचणी करू द्या. काँग्रेसने उगाच खोटी माहिती देऊन दिशाभूल केली आहे. गोव्याचा पर्यटन उद्योग, बाजारपेठेतील छोटे मासळीविक्रेते, रेस्टॉरंट व्यवसाय हे सगळे विरोधकांच्या राजकारणामुळे उध्वस्त होईल.

टॅग्स :goaगोवाFormalin Chemicalफॉर्मलीन केमिकल