शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

फोंडा पोटनिवडणूक: सर्वच पक्ष नेतृत्वाचा कसोटी काळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 07:45 IST

उमेदवारी न मिळाल्यास आरपारच्या लढाईस भाटीकर सज्ज

अजय बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : फोंडा विधासनभा मतदारसंघासाठी होणारी आगामी पोटनिवडणूक ही मगो, भाजप व काँग्रेस पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यासाठी कसोटीची ठरणार आहे. त्यांच्या पक्ष निष्ठेचा कस लागणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. संपूर्ण फोंडा तालुक्यात मतदार आपल्या परीने तर्क लावण्यात गर्क असतानाच पणजी व दिल्लीमध्ये नेमके काय घडते यावर या नेत्यांचे भवितव्य अवलंबून असेल.

मगो पक्षाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास डॉ. केतन भाटीकर हे आरपारची लढाई लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी थेट सांगितले आहेत की, कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. आज संपूर्ण सोशल मीडियावर केतन भाटीकर यांचे ते वक्तव्य व एका खाजगी राज चॅनलला दिलेली मुलाखत धुमाकूळ घालत आहे.

मगो नेते तथा वीज मंत्री सुदिन ढवळीकर म्हणत आहेत की, ते केतन भाटीकर यांच्याशी या संदर्भात बोलतील. तर दुसरीकडे भाटीकर म्हणतात की अपक्ष म्हणून पुढे जाईन. अर्ज भरण्याअगोदर सुदिन ढवळीकर यांचे आशीर्वाद नक्कीच घेईन. दीपक ढवळीकर यांनी 'ते' विधान करून विधानसभा निवडणूक एकतर्फी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भाटीकर यांनी जो पवित्रा घेतला त्यावरून त्यांचे ते वक्तव्य कदाचित चुकीचे होते, असे सर्वसामान्यांना वाटते. भाजपच्या नेत्यांनी मात्र सुरुवातीपासूनच सावध पवित्रा घेतला आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी मुख्यमंत्री, भाजप प्रदेश अध्यक्ष तिकडे होते. दिल्लीतील महत्त्वाचे नेतेही त्यावेळी फोंड्यात होते.

काँग्रेसच्या गोटात आता चलबिचल सुरू झाली आहे. कारणे अनेक आहेत. भाजपने समजा रितेश नाईक किंवा विश्वनाथ दळवी यांना उमेदवारी जाहीर केली तर भाजपविरोधात सर्वपक्षीय उमेदवार देण्याची संकल्पना पुढे येऊ शकते. काँग्रेस, आरजी, गोवा फॉरवर्ड हे सगळे पक्ष वेगळा विचार करताना एक भक्कम असा पर्याय भाजप समोर उभे करू शकतात. अशावेळी उमेदवारीबाबत सर्वात वर नाव असेल ते डॉ. केतन भाटीकर यांचेच.

सोशल मीडियावर भाटीकर यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे. सारासार विचार करून भविष्यात सर्वपक्षीय उमेदवार म्हणून ते पुढे आले तर आश्चर्य नाही. मागची ८ वर्षे जोमाने काँग्रेसचे काम पुढे नेलेल्या राजेश वेरेकर यांचे काय हा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना साहजिकच पडेल. रवीनी काँग्रेस सोडल्यानंतर मरगळल्या काँग्रेसमध्ये जान आणण्याचे काम त्यानी केले आहे. २०२२ च्या निवडणुकीत अटीतटीची अशी लढत दिली आहे.

पक्ष निष्ठेचाही विचार

एका बाजूने डॉ. भाटीकर यांच्या पक्ष निष्ठेचा कस लागत असताना, दुसऱ्या बाजूने भाजपचे फोंड्यातील भाजपचे महत्त्वाचे नेते विश्वनाथ ऊर्फ अपूर्व दळवी यांच्याही पक्ष निष्ठेची कसोटी सुरू झाली आहे. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी भाजपचा एकनिष्ठ सेवक आहे. मागची अनेक वर्षे भाजपसाठी तन-मन लावून काम केले आहे. त्यामुळे पक्ष त्यांना नाराज करणार नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मते रितेश नाईक हे काल-परवा भाजपमध्ये आले आहेत. तर विश्वनाथ दळवी हे सुरुवातीपासूनच भाजप बरोबर आहेत. समजा उमेदवारी डावलण्यात आली तर काय भूमिका घेणार यावर मात्र त्यांनी भाष्य करणे टाळले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Ponda By-Election: A Test for Leadership Across Parties

Web Summary : The upcoming Ponda by-election is crucial for leaders across MGP, BJP, and Congress, testing their party loyalty. Dr. Ketan Bhatikar is determined to contest, potentially as an independent. The BJP remains cautious, while Congress considers a united front, possibly fielding Bhatikar. Party loyalty is key for leaders like Vishwanath Dalvi.
टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणElectionनिवडणूक 2024