शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणे रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती; कारवाईसाठी तालुकास्तरावर देणार लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 07:32 IST

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सरकारी किंवा कोमुनिदाद जमिनीवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण केल्यास तात्काळ कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत देणारा आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अतिक्रमणे रोखण्यासाठी आणि तक्रारीवर तात्काळ कारवाई करण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून तालुकास्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण जिल्ह्यासाठीही अशा प्रकारचा आदेश लवकरच जारी केला जाणार आहे.

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी जारी सरकारी केलेल्या आदेशानुसार जमिनींवरील अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे राज्य सरकारच्या महसूल विभागाच्या परिपत्रकात म्हटले आहे. त्याचबरोबर कोमुनिदाद जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामे, जमिनीचा गैरवापर, नव्याने होणारी अतिक्रमणे रोखण्यासाठी विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

उपजिल्हाधिकारी, दंडाधिकारी करणार नेतृत्व पथकांचे नेतृत्व 

उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी करणार असून, पथकात कोमुनिदाद प्रशासक, मामलेदार, तलाठी, नगरपालिका निरीक्षक, पंचायत सचिव, नगर व ग्राम नियोजन विभागाचे प्रतिनिधी, किनारी क्षेत्र प्राधिकरणाचे प्रतिनिधी तसेच पोलिस निरीक्षक किंवा सहाय्यक पोलिस निरीक्षक यांचा समावेश असेल. 

भरारी पथके केवळ कार्यालयीन वेळेतच नव्हे तर शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही सक्रिय राहणार आहेत. अतिक्रमण सुरू असल्याची माहिती मिळताच पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन काम थांबवणे, आवश्यक असल्यास साहित्य जप्त करणे आणि पुढील कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे.

तक्रारींसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक

नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेण्यासाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप क्रमांक प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीवर भरारी पथकाने त्वरित कारवाई करणे आवश्यक राहणार आहे. तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास किंवा विलंब केल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

खंडपीठाचे आदेश

बेसुमार वाढणाऱ्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने प्रशासनाला या संबंधी कारवाई करण्याचा आदेश दिला होता. प्रशासनाने नागरिकांनाही आवाहन केले आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण आढळल्यास त्वरित संबंधित यंत्रणेकडे माहिती द्यावी असे सांगण्यात आले आहे.

दरमहा अहवाल

भरारी पथकांनी केलेल्या कारवाईचा सविस्तर मासिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोणत्याही अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे अतिक्रमण रोखण्यात अपयश आल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

महसूल खात्याकडूनही आदेश जारी

सरकारी तसेच कोमुनिदाद जमिनीवरील अतिक्रमणांना कोणतीही परवानगी दिली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका महसूल विभागाने परिपत्रकाद्वारे मांडली आहे. अतिक्रमण रोखण्यात कुचराई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. महसूल विभागाने स्पष्ट केले आहे की, 'माझे घर योजना' ही केवळ ठराविक निकष पूर्ण करणाऱ्या निवासी घरांपुरती मर्यादित असून, या चौकटीबाहेरील कोणतेही बांधकाम संरक्षणाखाली येणार नाही. तसेच कोणतेही नवीन अतिक्रमण आढळल्यास त्यावर तात्काळ व कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार