शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
7
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
8
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
9
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
10
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
11
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
12
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
13
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
14
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
15
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
16
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
18
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
19
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा

गोव्यात कोरोनामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 18:50 IST

दोन दिवसांपूर्वीच त्याला मडगावच्या कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याचा बळी गेला. आल्तिनो येथे तीन व्यक्ती कोविडग्रस्त आढळल्या आहेत.

पणजी : राज्यात कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढतच चालली आहे. मंगळवारी आणखी पाच जणांचा बळी गेला. यात 29 वर्षीय युवकाचाही समावेश आहे. राजधानी पणजीत कोरोनाचा फैलाव सुरूच आहे. पणजीत आणखी दहा कोविडग्रस्त मंगळवारी आढळले. हातुर्ली- मये येथील 40 वर्षीय तरुणाचा मंगळवारी मृत्यू झाला. हा तरुण सावर्डे येथे काम करत होता. चार दिवसांपूर्वीच तो मयेला आला होता. त्याला कोविडची लागण झाल्याचे म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात स्पष्ट झाले. मये मतदारसंघात कोविडचा हा पहिला बळी ठरला आहे. आल्तिनो पणजी येथील एका 29 वर्षीय युवकाचा कोविडमुळेच मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच त्याला मडगावच्या कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याचा बळी गेला. आल्तिनो येथे तीन व्यक्ती कोविडग्रस्त आढळल्या आहेत.राज्यातील ज्या पाच जणांचे मंगळवारी कोविडमुळे निधन झाले, त्यापैकी दोघे जण मडगावमधील आहेत. 8० वर्षीय व 79 वर्षीय दोघा इसमांचा बळी गेला. यापैकी 79 वर्षीय व्यक्ती ही वाडे वास्को येथील आहे. याशिवाय मडगावमधील 54 वर्षीय कोविड रुग्णाचे निधन झाले. घोगळ येथील 8० वर्षीय पुरुष रुग्णाचाही कोविड इस्पितळात मृत्यू झाला.पणजीत नवे 10 रुग्णपणजीतील मळा भागात मंगळवारी तीन नवे कोविडग्रस्त आढळले. आल्तिनो येथील सद्दाम शेख ह्या युवकाचा कोविडने बळी घेतला.भाटान करंजाळे येथे दोघे आढळळे. मिरामार व पाटो- रायबंदर येथे प्रत्येकी एक आणि आल्तिनोला तीन रुग्ण आढळले. मिरामारला पापाजान रेस्टॉरंटच्या परिसरात 24 वर्षीय युवकाला कोविडची लागण झाली. मळा येथे चाळीस वर्षीय युवतीला तसेच भाटान करंजाळे येथे 31 वर्षीय युवतीला कोविडची लागण झाली आहे. आल्तिनोच्या झोपडपट्टीचा भाग सिल केला गेला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस