शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
3
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
4
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
5
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
6
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
7
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
8
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
9
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
10
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
11
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

गोव्यातून मासळी निर्यात बंद केल्यास मच्छिमार व्यवसाय संकटात पडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 8:25 PM

गोव्यात मासळी निर्यात बंद झाल्यास मासळी व्यवसायावर त्याचे परिणाम होण्याची भीती स्वत ट्रॉलर मालक असलेले राज्याचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी केली होती.

मडगाव - गोव्यात मासळीतील फॉर्मेलिनच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने मासळी आयातीवर बंदी घातली असताना आता दुसरीकडे मासळी निर्यातीवरही बंदीची मागणी होत असताना, निर्यात बंद झाल्यास मासळी व्यवसायावर त्याचे परिणाम होण्याची भीती स्वत ट्रॉलर मालक असलेले राज्याचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी निर्यातावर बंदीची मागणी करण्यांनी गोव्यातील ट्रॉलर मालकांचे ट्रॉलर स्वतहा विकत घ्यावेत असा सल्ला दिला आहे.आज गोव्यातील मडगाव येथे आलेमाव यांनी पत्रकार परिषद घेतली. गोव्यातून राणो, बाळे व टुना ही मासळी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते व हीच मासळी शंभर टक्के विदेशात निर्यात केली जाते. गोव्यात ही मासळी कुणी खातही नाही अशी माहितीही आलेमाव यांनी यावेळी दिली.मासळी आयातीवर सरकारच्या बंदीचेही आलेमाव यांनी स्वागत केले. राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणो तसेच नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांच्या निर्णयाचेही आपण स्वागत करीत असल्याचे ते म्हणाले. लोकांचे आरोग्य महत्वाचे आहे. फॉर्मेलिन म्हणजे एकाप्रकारे वीषच होय. लोकांच्या आरोग्याकडे खेळू नये. आयातीवर बंदी उठविण्याची मागणी सरकारातील काही घटक करीत एफडीएने घालून दिलेल्या नियम व अटीचे पालन करुन मासळी आयात करण्यात हरकत नाही. मात्र शेवटी हा निणर्य लोकांना विचारुनच घ्यावा लागणार आहे असेही ते म्हणाले.गोव्यातील घाउक मासळी मार्केट परप्रांतियाच्या ताब्यात गेले आहेत. हे मार्केट नीज गोवकारांच्या हाती असले पाहिजे अशी मागणीही आलेमाव यांनी केली. गोव्यात जेव्हा पावसाळयात मासेमारी बंदी असते तेव्हा आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथे मासेमारीचा मौसम असतो, त्या ठिकाणी मोठ मोठया शितपेटया आहेत. मात्र या राज्यात पाण्याची टंचाई असल्याने तेथे बर्फ उपलब्ध होण्यास अडचणी असतात. रंगविहरीत फॉर्मेलिनचे पाणी या माशांवर टाकले जात असल्याचा दावाही आलेमाव यांनी केला.गोवा राज्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मासळी आयातावर बंदीची मागणी केली होती. आपणही ती केली होती. आज काँग्रेसचे काही सदस्य मासळी आयात बंद करा असे सांगताना दुसरीकडे काहीजण आयात सुरु करा म्हणतात. कॉग्रेस या फॉर्मेलिन इश्युचे राजकारण करु बघत असल्याचा आरोपही त्यांनी केला.मडगावच्या घाउक मासळी मार्केटमध्ये फॉर्मेलिनयुक्त मासळी मिळाली होती. त्या दोषींवर कारवाई होणो गरजेचे असून, त्यांना अटक करा अशी मागणीही केली आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारgoaगोवा