शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

गोव्यात येणारी मासळी फॉर्मेलिन असलेलीच, आपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 11:05 PM

परराज्यातून गोव्यात येणा-या मासळीत फॉर्मेलिन हे घातक द्रव्य असल्याचे एफडीएच्या चाचणीत मागच्या जून महिन्यात सिद्ध झाल्यानंतर गोव्यात मोठा गदारोळ माजला होता.

मडगाव - परराज्यातून गोव्यात येणा-या मासळीत फॉर्मेलिन हे घातक द्रव्य असल्याचे एफडीएच्या चाचणीत मागच्या जून महिन्यात सिद्ध झाल्यानंतर गोव्यात मोठा गदारोळ माजला होता. त्यानंतर गोव्यात येणारी मासळी खाण्यासाठी योग्य असल्याचा दावा सरकारने केल्यानंतर गोव्यातील जनतेने सुटकेचा श्र्वास सोडला होता. मात्र गोव्यात येणा:या मासळीमध्ये अजुनही फॉर्मेलिन सापडते असा दावा आम आदमी पक्षाने केला असून त्या पृष्ठर्थ चाचणीचे व्हिडिओही व्हायरल केल्याने पुन्हा एकदा गोव्यात गदारोळ माजण्याची शक्यता आहे.गोव्यातील मासळी फॉर्मेलिन मुक्त असा दावा गोवा सरकार करत असले तरी बाजारात येणारी मासळी फॉर्मेलिनचीच असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला असून आपल्या आरोपाच्या पृष्ठर्थ मडगाव, कोलवा, लोटली व केपे या बाजारातून खरेदी केलेल्या माशांचा फॉर्मेलिन चाचणीनंतर रंग बदलतो असा दावा करणारे व्हिडिओही व्हायरल केले आहेत.गुरुवारी आपचे दक्षिण गोवा प्रवक्ते सिद्धार्थ कारापूरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि गोवेकरांच्या मनातील भीती दूर करावी अशी मागणी केली. यावेळी त्यांच्याबरोबर रिचर्ड डिसा, रामीरो मास्कारेन्हस तसेच पेट्रीसिया फर्नाडिस हे उपस्थित होते.मागच्या वर्षी जुन महिन्यात मासळीत फॉर्मेलीन सापडल्याचे वृत्त पसरल्यानंतर संपूर्ण गोव्यातील लोक हादरुन गेले होते. त्याचा परिणाम गोव्याच्या पर्यटनावरही झाला होता. त्यानंतर हे प्रकरण अगदी न्यायालयार्पयत पोहोचले होते. मात्र यावर्षी लोक हा विषय विसरले होते. अशातच आता आपने हा आरोप केल्याने पुन्हा एकदा लोकामध्ये भीती निर्माण होण्याची शक्यता आहे.आपचे कारापूरकर म्हणाले, आपच्या कार्यकत्र्यानी मडगाव होलसेल मार्केट तसेच कोलवा, लोटली व केपे या मार्केटातून पॉपलेट व लेपा विकत घेऊन फिश टेस्ट किटद्वारा त्या माशांची तपासणी केली असता माशांवर ठेवलेल्या कागदाचा रंग निळा झाल्याचे दिसून आले. या किटप्रमाणो माशांवर ठेवलेल्या किटमधील कागदाचा रंग निळा झाल्यास त्यात फॉर्मेलिन आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे गोव्यात येणा:या माशात फॉर्मेलिन असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे हे मासे खाण्यालायक आहेत की नाहीत हे सरकारने स्पष्ट करावे आणि लोकांच्या मनातील संभ्रम दूर करावा.गोव्यात येणारे मासे गोव्याच्या सीमेवर तपासले जातात असा दावा सरकार करते मात्र गोव्यात मोठय़ा प्रमाणावर रेल्वेतूनही मासे येतात त्याचे काय असा सवाल त्यांनी केला. गोव्यात येणा:या माशांची आणि इतर वस्तूंची तपासणी करण्यासाठी सुसज्ज अशी प्रयोगशाळा स्थापन करणार असे आश्र्वासन सरकारने दिले होते त्याचे काय झाले असा सवालही त्यांनी केला. यापूर्वी एफडीएच्या आयवा फर्नाडिस यांनी केलेल्या तपासणीत गोव्यात येणा:या माशात फॉर्मेलिन असल्याचे सिद्ध झाले होते. आपली जबाबदारी प्रामाणिकपणो पार पाडणा:या या महिला अधिका:याची नंतर मडगावातून बदली केली गेली याचाही उल्लेख कारापूरकर यांनी यावेळी केला.

टॅग्स :AAPआपgoaगोवा