शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात जानेवारीमध्ये फिश फेस्टीव्हल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 13:18 IST

विविध प्रकारच्या मत्स्य संपत्तीबाबत समृद्ध असलेल्या गोव्यात येत्या जानेवारीच्या अखेरच्या आठवडय़ात फिश फेस्टीव्हल होणार आहे. मच्छीमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली.

पणजी- विविध प्रकारच्या मत्स्य संपत्तीबाबत समृद्ध असलेल्या गोव्यात येत्या जानेवारीच्या अखेरच्या आठवडय़ात फिश फेस्टीव्हल होणार आहे. मच्छीमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली.अनेक प्रकारच्या माशांसाठी गोवा प्रदेश ओळखला जातो. येथील मत्स्य संस्कृती जगात प्रसिद्ध आहे. पर्यटकांनाही या संस्कृतीचे मोठे आकर्षण असते. गोव्यात एरव्ही फिश फेस्टीव्हल हा डिसेंबर महिन्यात होत असतो. त्यावेळी पर्यटकही मोठ्या संख्येने आलेले असतात. तथापि, मच्छीमार खात्याची अजून तयारी झालेली नाही. मंत्री पालयेकर म्हणाले, की आम्ही 7 डिसेंबरला फिश फेस्टीव्हल आयोजित करावा असे अगोदर ठरवले होते. तथापि, आता हा महोत्सव येत्या  27 जानेवारीला आयोजित करू. डिसेंबरमध्ये विविध सोहळे होत असतात. जानेवारीमध्ये मोकळा वेळ मिळेल. 27 ते 30 जानेवारी या दिवसांत फिश फेस्टीव्हल आयोजित करण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करणार आहे. पणजीत बांदोडकर मैदानावर हा महोत्सव होईल.

मंत्री पालयेकर म्हणाले, की गोव्यात माशांचे उत्पादन वाढावे म्हणून विविध योजना राबविल्या जात आहेत. गोव्यातील मत्स्स्यसंपत्ती गोव्याबाहेर जास्त प्रमाणात जाऊ नये म्हणून उपाययोजना केली जाईल. त्यासाठी कायद्यातही दुरुस्ती केली जाणार आहे. गोव्याहून कर्नाटक आणि अन्य राज्यांमध्ये मासे निर्यात केले जातात. राज्याच्या तपास नाक्यांवर यासाठी शूल्क लागू केले जाईल. सध्या काहीच शूल्क नाही. गोव्यातील मासळी गोव्यातच राहिली तर, येथे तुटवडा जाणावरणार नाही. त्यामुळे मग मासे स्वस्त होतील. आम्ही गोमंतकीयांना अनुदानित दराने मासळी देऊ पाहत आहोत.

मंत्री पालयेकर म्हणाले, की केंद्र सरकारने एलईडी फिशिंग आणि बुल ट्रॉलिंग ह्या घातक मासेमारीपद्धतीविरुद्ध बंदी लागू केली आहे. या बंदीची गोव्यात प्रभावीपणो अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळेच बाजारपेठेत सध्या खूप मोठय़ा प्रमाणात मासे उपलब्ध असल्याचे दिसून येते. तथापि, राज्याच्या जेटींवर पोलिस ठेवावेत असाही विचार आम्ही करत आहोत. पारंपरिक मच्छीमारांचे आम्ही हित जपू. समुद्रात बंदीचे उल्लंघन करून किंवा अन्य बेकायदा पद्धतीने जे मासेमारी करतात त्यांच्याविरुद्ध कारवाई कडक केली जाईल. त्यासाठी शुल्काचे प्रमाण वाढविले जाईल. आम्ही अशा प्रकरणी 92 व्यक्तींना नोटीसा पाठविल्या आहेत. आणखी तीनशेजणांना नोटीसा पाठविल्या जातील. 

टॅग्स :goaगोवा