शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

'फिश करी-राइस' हे गोव्याचे जीवनचक्र: निवृत्त न्यायमूर्ती रिबेलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 12:43 IST

निवृत्त न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'फिश, करी आणि राइस'ला मी केवळ खाद्यसंस्कृती म्हणून पाहत नाही, तर याकडे बारकाईने पाहिल्यास यात गोव्याचे जीवनचक्रच दिसते, असे मत निवृत्त न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांनी केले. गोवा फाऊंडेशनच्या वतीने 'फिश करी अँड राइस' या पुस्तकाची सुधारित व विस्तारित पाचवी आवृत्ती शनिवारी कला अकादमीमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

निवृत्त न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाला निवृत्त न्यायमूर्ती गौतम पटेल, गोवा फाऊंडेशनचे संस्थापक क्लॉड आल्वारिस, अॅड. नॉर्मा आल्चारिस, गोवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डिन डिक्रूझ, पर्यावरणतज्ज्ञ कमलाकर साधले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

निवृत्त न्यायमूर्ती रिबेलो म्हणाले की, फिश करी आणि राइस यासाठी लागणाऱ्या गोष्टी समुद्र, झरे, डोंगर, शेती आणि जंगल यातूनच येते. मात्र, याच गोष्टी सरकार नष्ट करू लागले आहे. त्यामुळे 'फिश करी अँड राइस' हे राज्याच्या पर्यावरण, संस्कृती आणि पारंपरिक जीवनशैलीचे दस्तऐवजीकरण आहे. या पुस्तकातून पुढे सरकारविरोधात लढण्यास बळ देणार आहे.

रिबेलो म्हणाले की, 'राज्यात सध्या होत असलेली अनियंत्रित विकासाची प्रक्रिया राज्याच्या पर्यावरणासाठी धोकादायक आहे. भारताच्या राज्यघटनेनुसार पर्यावरणाचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पण, येथे यासाठी प्रयत्न केल्यास सरकारकडून कडक भूमिका घेतली जाते. सरकारने लोकांचे अधिकार समजून घेत त्यांच्यावर कडक शब्दांत बोलणे टाळावे.'कार्यक्रमात दिवंगत पर्यावरण कार्यकर्त्या डायना तावरीस यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच, राज्याच्या पर्यावरण व वारसा संरक्षणासाठी काम करणाऱ्या १६ संस्था व व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. 

यात अशोक शिरोडकर, ऑविल रॉड्रिग्स, मयूर शेटगावकर, ज्युडिथ अल्मेडा, जेरिफा डिसुझा, अँजेलो बरेटो, शोगुन फर्नांडिस, गोविंद शिरोडकर, डॉ. नंदकुमार कामत, संकेत नाईक, महेश म्हांबरे, प्रा. एल्सा फर्नांडिस, वामन शिरोडकर व सुरेश भोमकर, अव्हर्टिनो मिरांडा, अॅड. प्रसाद शहापूरकर, जॅक मस्करेन्हस यांचा समावेश होता.

पुस्तकाचे संपादक क्लॉड अल्वारीस म्हणाले की, '१९९३ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाने राज्याच्या पर्यावरण चळवळीचे दस्तऐवजीकरण केले होते. बदलत्या परिस्थितीमुळे नव्या आवृत्तीत अनेक नवीन लेख व माहिती समाविष्ट करण्यात आली असून, सुमारे १५० जणांनी या पुस्तकासाठी योगदान दिले आहे.' 

English
हिंदी सारांश
Web Title : Fish, Curry, Rice: Goa's life cycle, says Justice Rebeiro.

Web Summary : Justice Rebeiro sees 'Fish, Curry, Rice' as Goa's life cycle, not just food. Book highlights environmental threats, advocating for preservation of culture and environment. New edition launched.
टॅग्स :goaगोवाcultureसांस्कृतिक