शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अखेर वीरेशचे उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांकडून तोडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 12:48 IST

सांत आंद्रे मतदारसंघातील ३९ अ अंतर्गत सर्व परवानग्या स्थगित

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सांत आंद्रे मतदारसंघातील कलम ३९अ अंतर्गत जमीन रूपांतरणाच्या सर्व तात्पुरत्या व अंतिम प्रस्तावांना तत्काळ स्थगिती देण्यात आल्याचे अधिकृत पत्र प्राप्त झाल्यानंतर काल, गुरुवारी रात्री उशीरा आमदार वीरेश बोरकर यांनी आझाद मैदानावरील सहा दिवसांचे उपोषण मागे घेतले. त्यांच्यासोबत उपोषणास बसलेले तुषार गावस यांनीही उपोषण मागे घेतले.

मुख्य नगर नियोजक (सीटीपी) वर्तिका डागर यांच्या अधिकृत लेटरहेडवर जारी करण्यात आलेले पत्र उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी बोरकर यांच्याकडे सुपूर्द केले. यापूर्वी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिले होते; मात्र 'सस्पेंडेड' या शब्दाचा नेमका अर्थ स्पष्ट करण्याची मागणी बोरकर यांनी केली होती. त्यानंतर आवश्यक स्पष्टिकरणांसह सुधारित अधिकृत पत्र देण्यात आले.

उपोषण मागे घेण्यापूर्वी बोरकर यांनी शिरदोण-पाळे येथील ग्रामस्थांची संमती घेतली. आंदोलनाला विशेषतः महिलांचा भक्कम पाठिंबा लाभल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक महिला फळ-भाजी विक्रेते असून, ९० वर्षीय महिलेनेही आंदोलनात सहभाग घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, सांत आंद्रे मतदारसंघात टीसीपीच्या कलम ३९ अ अंतर्गत केलेला झोनबदल रद्द करणारा आदेश मुख्य नगरनियोजक वर्टिका डागर यांनी काल, गुरुवारी जारी केला होता. उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यानी आझाद मैदानावर उपोषणकर्ते आमदार वीरेश बोरकर यांची भेट घेऊन यासंबंधीचे पत्रही दिले. परंतु आंदोलक ३९ अ कलम पूर्णपणे रद्दच केले जावे, या मागणीवर ठाम राहिले.

सांत आंद्रे मतदारसंघातच ३९ अ कलमाखाली तब्बल ८४ हजार चौ. मी. पेक्षा जास्त जमिनीच्या बाबतीत झोनबदल केल्याची आंदोलकांची तक्रार आहे. पाळे, शिरदोणच्या ग्रामस्थांनी याच मुद्यावरुन आंदोलन सुरू केले होते. परंतु नंतर हे आंदोलन चिघळले. आंदोलकांच्या मते झोनबदलामुळे सांत आंद्रेतील नैसर्गिक आच्छादन, नो डेव्हलपमेंट झोन आणि बागायती क्षेत्र सेटलमेंट झोनमध्ये बदलण्यास मंजुरी देण्यात आली. हे रूपांतरण प्रामुख्याने पाळें, शिरदोण आणि आसपासच्या डोंगर उतारांवर झाले असल्याचा आरोप आहे. हा भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील मानले जातो. झोनबदलामुळे डोंगरफोड करुन मोठी बांधकामे येतील तसेच आणि पूर-भूस्खलनाचा धोका वाढू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

आमदार विरेश बोरकर यांनी काल, गुरुवारी दिवसभर उपोषण सुरू ठेवले. आझाद मैदानावर आरजीचे नेते विश्वेश नाईक, काँग्रेसचे नेते सुनील खवठणकर, सामाजिक कार्यकर्ते गोविंद शिरोडकर आदी उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेस नेते सुनील कवठणकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, टीसीपी खात्यातून फाइल्स गायब होणे ही नवी बाब नाही. आता ही एक सामान्य घटना झाली आहे. २०२१ मध्ये स्थानिकांनी एका बेकायदेशीर प्रकल्पाबाबत तक्रार केली तेव्हा संबंधित फाइल हरवल्याचे कारण या खात्याने दिले होते. आता मुद्दाम लोकांवर आरोप करत या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष विचलीत करण्याचा हा प्रयत्न आहे.'

सांतआंद्रे सायंकाळी मतदारसंघातील झोन बदलाचे प्रस्ताव निलंबित करण्यात येत असल्याचे पत्र घेऊन जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी आझाद मैदानात आमदार बोरकर यांची भेट घेतली. मात्र, बोरकर यांनी हे पत्र स्वीकारले नाही. या पत्रातील काही मुद्यांबाबत जोपर्यंत योग्य स्पष्टीकरण मिळत नाही, तोपर्यंत माघार न घेण्याची भूमिका बोरकर यांनी घेतली आहे, अशी माहिती, 'गाकुवेध'चे प्रमुख गोविंद शिरोडकर यांनी दिली. 

झोन बदल निलंबित करण्याचे पत्र देण्यात आले तरी या पत्रात ज्या नऊ ठिकाणी कामे सुरू आहेत, त्यांचा उल्लेख केलेला नाही. झोन रद्द करणे म्हणजे नेमके काय? तात्पुरते रद्द की कायमस्वरुपी ? याचे स्पष्टीकरण आमदारांनी मागितले आहे. जे पत्र देण्यात आले ते नगरनियोजन खात्याच्या अधिकृत लेटरहेडवर का नाही? असाही प्रश्न बोरकर यांनी उपस्थित केला.

गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून संवाद साधून गावकऱ्यांवरील गुन्हे पुढे नेले जाणार नाहीत, असे आश्वासन दिल्याचे आमदार बोरकर म्हणाले. 'कलम ३९अ बाबत विधानसभेत चर्चा घडवून आणून ते संपूर्ण राज्यात रद्द करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संबंधित प्रस्ताव सभागृहात आल्यास पक्षभेद बाजूला ठेवून सर्व आमदारांनी पाठिंबा द्यावा', असे आवाहन करत आमदार बोरकर यांनी, कलम रद्द न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही दिला. आमदार वीरेश बोरकर यांनी 'हे दुसरे स्वातंत्र्ययुद्ध आहे' असे म्हणत सातेरी मंदिराचा प्रसाद घेऊन अॅड. नॉर्मा आल्वारिस यांच्या हस्ते उपोषण सोडले. आंदोलनस्थळी क्लॉड आल्वारिस व अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : MLA Borcar Ends Fast After Assurance on Land Conversion Issue

Web Summary : MLA Viresh Borcar ended his six-day hunger strike after receiving written assurance to halt land conversions under Section 39A. The decision followed concerns about environmental impact and zoning changes in Sao Andre constituency. Villagers' crimes will be reviewed; further action threatened if demands aren't met.
टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण