शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणी शेवटी त्या शिक्षकाचे निलंबन

By आप्पा बुवा | Updated: September 13, 2023 18:55 IST

सदर विनयभंगाचे प्रकरण तीन महिन्यापूर्वी घडले होते असा दावा लोकांनी केला होता  या संदर्भात मुलीच्या पालकानी तक्रारी शाळेच्या संबंधित घटकांकडे केल्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : विद्यार्थिनी वरील विनयभंग प्रकरणी शिक्षकावर कारवाही होत नाही ते पाहून संतप्त झालेल्या ग्रामस्थांच्या रोशास बळी पडून शेवटी त्याचे निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्यातील एका माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी शारीरिक शिक्षकाच्या विरोधात शाळा व्यवस्थापनाने शिस्तभंगाची कारवाई म्हणून घटनेच्या कित्येक दिवसानंतर सदर निलंबनाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सदर शिक्षकाने पणजी येथील बाल न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनावर निवाडा आला असून ,बाल न्यायालयाने शिक्षकाचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

सदर विनयभंगाचे प्रकरण तीन महिन्यापूर्वी घडले होते असा दावा लोकांनी केला होता  या संदर्भात मुलीच्या पालकानी तक्रारी शाळेच्या संबंधित घटकांकडे केल्या होत्या. परंतु त्या शिक्षकाविरुद्ध कोणतीच कारवाई केली नव्हती. परिणामी आर जी  पक्षाचे कार्यकर्ते व काही ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन म्हार्दोळ पोलीस स्थानकावर सदर शिक्षकाविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर सुद्धा त्या शिक्षकावर कारवाई होत नाही ते पाहून ग्रामस्थांनी  पोलीस स्थानकांच्या समोर मोठ्या संख्येने जमा होऊन निषेध व्यक्त केला होता. तसेच मुदतीत सदर शिक्षकांवर कारवाई न झाल्यास पोलीस स्थानका समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला होता. 

गोवा शालेय नियम अधिनियम १९८४ च्या कलम ११ (३) च्या अधिकाराचा वापर करून शाळेच्या व्यवस्थापकीय समितीच्या अध्यक्षांनी शारीरिक शिक्षकाला ६ सप्टेंबरपासून १५ दिवसांसाठी निलंबनाचा आदेश जारी केला आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार एका विद्यार्थिनीवर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आल्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीकडे १३ जुलै रोजी दाखल करण्यात आली होती. शाळा व्यवस्थापनाने १५ जुलै रोजी त्या शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावून त्याच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई का सुरू केली जाऊ नये, याचे स्पष्टीकरण मागितले होते. परंतु या संदर्भात सदर शिक्षकाकडून समाधानकारक स्पष्टीकरण व्यवस्थापनाला मिळाले नव्हते.व्यवस्थापनाकडून कोणतीही कारवाई शिक्षकावर न केल्याने मुलीच्या पालकांनी रितसर तक्रार म्हार्दोळ पोलीस स्थानकात दाखल केल्यानंतर शारीरिक शिक्षकावर २८ ऑगस्ट रोजी विनयभंगप्रकरणी भा.दं.सं. ३५४, गोवा बाल कायदा २००३ चे कलम ८ (२) व पोस्को कायद्याचे कलम १२ आणि ८ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्याला अनुसरून अखेर शाळा व्यवस्थापनाने उशिरा का होईना त्या संशयित शारीरिक शिक्षकाविरोधात निलंबनाचे आदेश जारी केले आहे.

टॅग्स :Molestationविनयभंग