शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात रेराखाली प्रकल्प नोंदणीसाठी संकेतस्थळ, ग्राहकांना आॅनलाइन तक्रारीची सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 21:01 IST

बिल्डर, डेव्हलपर, इस्टेट एजंट यांनी रियल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅक्ट (रेरा) खाली नोंदणी करावी यासाठी तसेच मालमत्ता खरेदीच्या बाबतीत फसवणूक झाल्यास ग्राहकांना आॅनलाइन तक्रार करता यावी याकरिता गोव्याच्या पालिका प्रशासन खात्याने संकेतस्थळ सुरू केले आहे.

पणजी : बिल्डर, डेव्हलपर, इस्टेट एजंट यांनी रियल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅक्ट (रेरा) खाली नोंदणी करावी यासाठी तसेच मालमत्ता खरेदीच्या बाबतीत फसवणूक झाल्यास ग्राहकांना आॅनलाइन तक्रार करता यावी याकरिता गोव्याच्या पालिका प्रशासन खात्याने संकेतस्थळ सुरू केले आहे. आज मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते या संकेतस्थळाचे उद्घाटन झाले. २४ फेब्रुवारीपर्यंत बिल्डरना नोंदणी करावी लागणार आहे.पालिकामंत्री फ्रान्सिस डिसोझा हेही यावेळी उपस्थित होते. संकेतस्थळाचे उद्घाटन केल्यानंतर पर्रीकर म्हणाले की, सदनिका, अपार्टमेंट किंवा भूखंड खरेदी करताना ग्राहकांना या संकेतस्थळावरुन आधी संबंधित प्रकल्पाविषयी इत्यंभूत माहिती घेता येईल. निर्धारित वेळेत फ्लॅटचा ताबा न देणे, बांधकामास विलंब लावणे अशा प्रकारच्या तक्रारी सर्रास असतात. बिल्डर किंवा डेव्हलॉपरविरुद्ध फसवणुकीची तक्रार आॅनलाइन पाठवता येईल. साधारणपणे ४५0 ते ५00 बिल्डर तसेच रियल इस्टेट एजंट नोंदणी करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.बिल्डर, डेव्हलपर, रीयल इस्टेट एजंट यांनी रेराखाली प्रकल्प नोंदणी करण्यासाठी त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन स्वत:चे इमेल खाते वापरुन करता येईल. आयडी व्हेरिफिकेशनसाठी वन टाइम पासवर्ड पाठवला जाईल. २0१६ च्या रेरा कायद्याखाली धोरणाच्या अंमलबजावणीस वाव मिळेल. नोंदणीसाठी प्रत्यक्षात ९0 दिवसांचा कालावधी देणे आवश्यक आहे. परंतु २४ फेब्रुवारी रोजी मुदत संपत असल्याने अल्प कालावधी मिळतो, याकडे लक्ष वेधले असता कोणाही रियल इस्टेट एजंटना काही समस्या असल्यास त्यांनी खात्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.दरम्यान, येत्या १ एप्रिलपासून राज्यात कालबद्ध सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणार असून वेळेत सेवा न देणा-या अधिका-यांवर कडक कारवाई केली जाईल, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. सेवा देण्यास विलंब करणा-या अधिका-यांना दंड ठोठावला जाईल. बांधकामांच्या बाबतीत पंचायतीने विनाकारण परवाने देण्यास विलंब केल्यास पंचायत सचिवाला जबाबदार धरले जाईल, असे ते म्हणाले. अर्जदाराचीही तेवढीच जबाबदारी आहे की, योग्य ती कागदपत्रे किंवा दस्तऐवज त्याने सादर करायला हवेत.

टॅग्स :goaगोवा