शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अमर्याद कोळसा हाताळणी प्रकरणात दोन आठवड्यांत स्पष्टीकरण द्या- न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 22:05 IST

पणजी: अमर्याद कोळसा हाताळणी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने साउथ वेस्ट पोर्ट लिमिटेडला दोन आठवड्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाला स्पष्टीकरण देण्याचा आदेश दिला आहे.

पणजी: अमर्याद कोळसा हाताळणी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने साउथ वेस्ट पोर्ट लिमिटेडला दोन आठवड्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाला स्पष्टीकरण देण्याचा आदेश दिला आहे. परवान्यापेक्षा अधिक प्रमाणात कोळसा हाताळणीसाठी या कंपनीला गोवा प्रदूषण मंडळाने नोटीस बजावली होती.कंपनीला वर्षाकाठी केवळ ४.१२५ दशलक्ष मेट्रिक टन कोळसा हाताळणीसाठी परवानगी आहे. परंतु एमपीटीकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केलेल्या अहवालात या कंपनीकडून १०. ११२ दशलक्ष मेट्रीक टन कोळसा हाताळणी करण्यात आल्याचे म्हटले आहे. म्हणजेच ५.९८७ दश्लक्ष मेट्रिक टन कोळसा हाताळणी अधिक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या अहवालाला अनुसरून प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीला नोटीस बजावली होती. त्यात बँक हमी रक्कम गोठविण्याची व इतर कारवाईचा इशारा देण्यात आला होता.प्रदूषण मंडळाच्या या नोटिसीच्या विरोधात कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात प्रदूषण मंडळानेही प्रतिज्ञापत्र दाखल करताना एमपीटीच्या अहवालाचा निर्वाळा देत कंपनीकडून कोळसा हाताळणीतील मर्यादेचे उल्लंघन करण्यात आल्याचे म्हटले होते. सरकारी अभियोक्ता प्रवीण फळदेसाई यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने युक्तिवाद करताना कंपनीला स्पष्टीकरणासाठी दोन आठवडे मुदत देऊ शकत असल्याचे सांगितले आणि खंडपीठाने तसा आदेशही दिला. न्यायालयाकडून हे प्रकरण निकालात काढण्यात आले.

टॅग्स :goaगोवा