शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

अनियमित पाणीपुरवठ्यावरून साकोर्डा येथे अभियंत्यांना घेराव

By आप्पा बुवा | Updated: May 3, 2023 20:07 IST

यावेळी सुमारे 90 ग्रामस्थांनी सह्या केलेले निवेदनसुद्धा अभियंते पवन शेट यांना देण्यात आले.

फोंडा - अनियमित पाणीपुरवठ्यामुळे हैराण झालेल्या नवें साकोर्डा येथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना घेराव घालून जाब विचारला. सुमारे दीडशे लोक या वेळी उपस्थित होते. यावेळी सुमारे 90 ग्रामस्थांनी सह्या केलेले निवेदनसुद्धा अभियंते पवन शेट यांना देण्यात आले.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या भागात पाण्याचा पुरवठा अनियमित असतो.  नळाला पाणी कधीतरी  येते. नळामधून येणारे पाणी बारीक धारेचे असते. परत आलेले पाणी लगेच बंद केले जाते. पाण्याच्या पुरवठा अगोदरच कमी त्यात परत  काही वेळा चक्क प्रदूषित पाणी लोकांच्या नळामधून येते. ज्यावेळी त्या भागातील वीज जाते त्यावेळी पाणी पुरवठा हमखास बंद केला जातो. साकोर्डा भागात नैसर्गिक जलस्त्रोते आहेत परंतु त्यांचे योग्य नियोजन होत नाही.  नवे साकोर्डा भागातील नागरिकांच्या हक्काचे पाणी  इतर ठिकाणी वळवण्यात येते . ह्यासंबंधी प्रश्न विचारून नागरिकांनी अभियंतांना भांडावून सोडले.  सदर प्रभागाचे पंच सदस्य महादेव शेटकर हे सुद्धा  नागरिकांना येऊन मिळाले. त्यांनी सुद्धा अभियंत्यांवर चांगलाच रोष व्यक्त करताना पाणी प्रश्नावर  जाब विचारले.शेटकर यांच्या म्हणण्यानुसार या भागात जी जलवाहिनी आहे ती वीस वर्षांपूर्वी घालण्यात आली होती. आताच्या काळात लोकांच्या गरजा वाढलेल्या आहेत. त्याचबरोबर नळ जोडण्या सुद्धा वाढलेल्या आहेत. परिणामी या जुन्या पाईपलाईन मधून जो पुरवठा होतो तो अपुरा पडतो.योग्य नियोजन न करता पाणी पुरविण्यात येते.परत  काही वेळा पाणी प्रक्रिया न करताच सोडले जात आहे. ह्या प्रदूषित पाण्यामुळे सदर भागात आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. तेव्हा सरकारने किमान आठ तास स्वच्छ पाण्याचा पुरवठा या भागात करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. नागरिकांचे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अभियंतानी त्यांना दोन दिवसाच्या आत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. सदर आश्वासन दिल्यानंतर नागरिक परत फिरले. परंतु दोन दिवसानंतर पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास मोठ्या संख्येने सार्वजनिक बांधकाम खात्यावर मोर्चा नेण्यात येणार असल्याची धमकी यावेळी देण्यात आली आहे. 

टॅग्स :goaगोवाWaterपाणी