शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा संपण्यापूर्वीच कैऱ्या बाजारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 18:20 IST

म्हापसा : पावसाळी हंगाम अद्याप संपलेला नसताना गोमंतकातील बाजारपेठेत कैऱ्या दाखल झाल्या आहेत. कैऱ्या सर्वप्रथम बाजारात उपलब्ध करुन देण्यात ओशेल येथील आंबा व्यावसायीक समीर धारगळकर यांना पुन्हा एकदा यश आले आहे. पुढील काही दिवसात दिवाळीपर्यंत आंबा विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.आंब्यांच्या केलेल्या चांगल्या प्रकारच्या मशागतीच्या जोरावर मागील ...

म्हापसा : पावसाळी हंगाम अद्याप संपलेला नसताना गोमंतकातील बाजारपेठेत कैऱ्या दाखल झाल्या आहेत. कैऱ्या सर्वप्रथम बाजारात उपलब्ध करुन देण्यात ओशेल येथील आंबा व्यावसायीक समीर धारगळकर यांना पुन्हा एकदा यश आले आहे. पुढील काही दिवसात दिवाळीपर्यंत आंबा विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

आंब्यांच्या केलेल्या चांगल्या प्रकारच्या मशागतीच्या जोरावर मागील काही वर्षांपासून धारगळकर सततपणे कैऱ्या बाजारात उपलब्ध करुन देतात. आंब्या प्रमाणे तेवढ्याच आवडीने कैऱ्यांचा वापर करणाऱ्या गोमंतकीयांना शंभर रुपयात दोन या प्रमाणे कैऱ्यांची विक्री त्यांनी करायला सुरुवात केली आहे. म्हापसापासून जवळ असलेल्या शिवोली येथील बाजारपेठेत त्यांनी या कैऱ्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या. हंगामातील पहिल्यास कैऱ्या विकत घेण्यासाठी ग्राहकांकडून त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसादही लाभला होता.

 याबाबत धारगळकर यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले राज्यातील आंबा हंगामाची सुरुवात साधारण मार्च महिन्यात होते. हा हंगामा साधारण तीन महिने चालतो. सध्या ऑक्टोबर महिना चालू आहे. अजुन पाच महिने आहेत; पण आताच कैऱ्या बाजारात उपलब्ध केल्या आहेत. यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे, गेल्या अनेक वर्षांपासून बाजारात सर्वप्रथम कैºया उपलब्ध करणे शक्य झाले आहे. येत्या काही दिवसात पिकलेले आंबे बाजारात आणले जाणार असल्याचे धारगळकर यानी सांगितले.

टॅग्स :goaगोवाMangoआंबा