शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

अमेरिकन व्हिसाची प्रतीक्षा वेळ कमी करणार; कॉन्सुल जनरल माइक हॅन्की

By किशोर कुबल | Updated: November 22, 2024 23:40 IST

- अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्येत २००८ पासून लक्षणीय वाढ

किशोर कुबल, पणजी : भारतातून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २००८ पासून लक्षणीय वाढत चालली असून गेल्या वर्षी ३ लाख ३० हजार भारतीय विद्यार्थी अमेरिकेत गेले. अमेरिकेचे मुंबईतील कोन्सुल जनरल माइक हॅन्की सध्या गोवा भेटीवर असून त्यांनी पत्रकारांची संवाद साधताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, अमेरिकन वाणिज्य दूतावास आणि भारतातील दूतावासाने भारतीयांकडून दहा लाखांहून अधिक व्हिसा अर्जांवर प्रक्रिया केली आहे.

हॅन्की म्हणाले की, व्हिसा प्रक्रिया आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्रिय उपाय काढले जात आहेत. व्हिसाची प्रतीक्षा वेळ कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. व्हिसा नूतनीकरणाच्या बाबतीत काही जणांना मुलाखतीच्या संदर्भात मुभा देण्याचाही विचार चालू आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांवर भर देताना म्हणाले की, 'आम्ही उभय देशांमधील चिरस्थायी संबंधांना महत्त्व देतो. तसेच  समृद्धी आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करतो.विद्यार्थी व्हिसातील वाढ उभय देशांमधील शैक्षणिक देवाणघेवाण वाढवण्याची व्यापकता संरेखित करते.  २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत ३५ टक्के वाढ झाली आहे. दोन्ही राष्ट्रांमधील मजबूत शैक्षणिक संबंध आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यातून अधोरेखित होते. 

भारतातील अमेरिकन मिशनने २०२३ मध्ये १२ लाखांहून अधिक नॉन-इमिग्रंट (अभ्यागत) व्हिसावर यशस्वी प्रक्रिया केली. तर केवळ मुंबईतील यूएस कॉन्सुलेट जनरल कार्यालयाने गेल्या वर्षी एकूण ४ लाख व्हिसांवर प्रक्रिया केली. हा एक विक्रमच ठरला आहे, असे ते म्हणाले.

'द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होणार'

द्विपक्षीय संबंधाबाबत विचारले असता हॅन्की म्हणाले की, नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील ,अशी अपेक्षा आहे. गेल्या दोन दशकांमध्ये जॉर्ज बुश, बराक ओबामा, ट्रम्प (त्यांच्या पहिल्या कार्यकाळात) किंवा ज्यो बिडेन यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ असो भारताशी अमेरिकेचे संबंध नेहमीच चांगले राहिलेले आहेत.

अमेरिकेतील भारतातील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे तसेच तंत्रज्ञान देवाण-घेवाण सहकार्यही वाढले आहे. माइक हॅन्की यांनी २०२२ मध्ये रोजी  मुंबई येथे अमेरिकन कॉन्सुल जनरल म्हणून सूत्रे हातात घेतली. ओमानमधील अमेरिकन दूतावासात त्यांनी डेप्युटी चीफ ऑफ मिशन म्हणून काम केले आहे. 

टॅग्स :goaगोवाEducationशिक्षणAmericaअमेरिका