शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सामुदायिक शेतीमुळे यंदा भाताचे उत्पादन वाढणार; कृषी संचालकांनी व्यक्त केला अंदाज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2024 16:41 IST

कृषी खात्याकडून सामुदायिक शेतीसाठी ९० टक्के अनुदान सुरु केल्याने मागील काही वर्षापासून सामुदायिक शेतीचे प्रमाण वाढले आहे.

नारायण गावस, पणजी: राज्यात कृषी खात्याकडून राबविल्या जाणाऱ्या सामुदायिक शेती या उपक्रमामुळे यंदाच्या वर्षी भात शेतीच्या लागवडीत वाढ हाेण्याची शक्यता कृषी खात्याचे संचालक नेव्हील अफान्सो यांनी व्यक्त  केली आहे. कृषी खात्याकडून सामुदायिक शेतीसाठी ९० टक्के अनुदान सुरु केल्याने मागील काही वर्षापासून सामुदायिक शेतीचे प्रमाण वाढले आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणात सामुदायिक शेतीसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी कृषी खात्याकडे अनेक अर्ज येत आहे.

सचालाक अफान्सो म्हणाले, राज्यात भात शेतीची लागवड वाढविली तसेच अनेक शेतकरी शेतीकडे वळावे यासाठी कृषी खात्यातर्फे सामुदायिक शेती हा उपक्रम सुरु केला आहे. किमान १० पेक्षा जास्त शेतकरी एकत्र येऊन ही शेती करु शकतात. यात भात शेतीची लागवड केली जात आहे. या शेतकऱ्यांना कृषी खात्याकडून भात तसेच  अन्य शेतीसाठी लागणारे इतर उपकरणावर ७० ते ९० टक्के अनुदान दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही शेती करताना काहीच नुकसान होत नाही. तसेच उत्पादनही जास्त प्रमाणात मिळते आता मान्सून पावसाला सुरुवात  होणार असल्याने अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी खास शेती करण्यासाठी अर्ज केले आहेत. 

संचालक नेविल अफान्सो म्हणाले, कृषी खात्याकडे शेतकऱ्यांना यंदा भात शेती लागवडीसाठी  शेतकऱ्यांना प्रोत्साहित  केले आहे. काही वर्षापूर्वी भात शेतीची लागवड कमी झाली हाेती. पण आता त्याला कृषी खात्याने पुर्नजीवीत केले असून जास्तीत जास्त शेतकरी भात शेतीकडे वळतात. यासाठी त्यांना पूर्ण सहकार्य सुरु केले आहे. शेतकऱ्यांना नांगरणीसाठी लागणारे ट्रॅक्टर, भात बियाणे, खत या सर्वांवर  ७० ते ९० टक्के अनुदानात दिले जात आहे. यंदाच्या वर्षी भात शेतीची लागवड वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :goaगोवाFarmerशेतकरीmonsoonमोसमी पाऊस