शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सरमुळे बोंबाबोंब; गोव्यात 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 21:24 IST

गोव्याचे तापमान ४७ अंश सेल्सीएस एवढे वाढल्यास काय होईल असे विचारल्यास त्यावर भरभरून लिहिता येईल. मोठी समस्या निर्माण होईल. ती जागतीत बातमीही होईल. पण..

 पणजी - गोव्याचे तापमान ४७ अंश सेल्सीएस एवढे वाढल्यास काय होईल असे विचारल्यास त्यावर भरभरून लिहिता येईल. मोठी समस्या निर्माण होईल. ती जागतीत बातमीही होईल. हवामान खात्याच्या स्वयंचलीत हवामान नोंदणी यंत्रणेनुसार गोव्याचे तापमान मंगळवारी ४७ अंश सेल्सीएस एवढे होते. अर्थात सेन्सर नादुरुस्त झाल्यामुळे ही चुकीची माहिती नोंद झाल्याचे नंतर उघढकीस आल्यामुळे केंद्राने ते बदलण्यासाठी तात्काळ हालचाली सुरू केल्या. 

राज्यात अनेक ठिकाणी तापमानाची माहिती देणारी स्वयंचलीत यंत्रणे आहेत. वाळपई, जुने गोवा, काणकोण व वास्को   या ठिकाणची माहिती आपोआप वेबसाईटवर अपडेट होत असते. परंतु या हवामान केंद्रांत बसविण्यात आलेले सेन्सर नादुरुस्त झाल्यामुळे चुकीची माहितीही लोकांना मिळत आहे असे दिसून आले आहे. तामान ४०  अंश सेल्सीएसपेक्षा अधिक वाढलेले दाखविण्याचे प्रकारही होत आहेत. सोमवारी तर ते ४७ अंश सेल्सीएस एवढे दाखविण्यात आले आहे. पणजी वेधशाळेचे संचालक म्हणून नव्यानेच ताबा घेतलेले कृष्णमूर्ती पडगलवार यांनी या सर्व केंद्रांची पाहाणी करून यंत्रणे सुधारण्यासाठी प्रक्रिया हाती घेतली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वयंचलीत तापमानाचा वेध घेणारे सेन्सर नादुरूस्त झालेले आढळून आले आहेत. हे सेन्सर तसे जुनेही होते. सेन्सर एक दोन महिन्यात नवीन बसविले जातील अशी माहिती पडगलवार यांनी दिली. पडगलवार हे स्वत: तंत्रज्ञान विषयक तज्ज्ञ आहेत. त्यामुळे केंद्राचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी सर्व उपकरणांची पाहाणी केली. त्यात त्यांना अनेक उपकरणाचे सेन्सर नादुरूस्त झाल्याचे आढळून आले. ते काढून बदलण्यासाठीही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रेन गेज यंत्रही नादुरुस्त झाले असून तेही बदलण्यात येणार आहे.

टॅग्स :Temperatureतापमानgoaगोवा