शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या वादातून चुलत भावाचा खून करणारा संशयिताला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 20:03 IST

जमिनीच्या वादातून आपल्या चुलत भावाचा खून करुन गेले सात दिवस फरार असलेल्या हेमंत देसाई याला आज शुक्रवारी पोलिसांनी केरी - सत्तरी येथील दाट जंगलात जेरबंद केले. मडगावपासून 18 किलो. मीटर दूर असलेल्या शेळवण - कुडचडे येथे मागच्या आठवडयात शुक्रवारी 23 फेब्रुवारीला खुनाची ही घटना घडली होती.

मडगाव : जमिनीच्या वादातून आपल्या चुलत भावाचा खून करुन गेले सात दिवस फरार असलेल्या हेमंत देसाई याला आज शुक्रवारी पोलिसांनी केरी - सत्तरी येथील दाट जंगलात जेरबंद केले. मडगावपासून 18 किलो. मीटर दूर असलेल्या शेळवण - कुडचडे येथे मागच्या आठवडयात शुक्रवारी 23 फेब्रुवारीला खुनाची ही घटना घडली होती. संशयिताने सुर्यकांत देसाई (44) याचा खून केला. या खून प्रकरणी हेमंतची आई शेवंती हिला कुडचडे पोलिसांनी अटक केली होती. तर खुनाच्या घटनेनंतर हेमंत फरार झाला होता. काल गुरुवारी दक्षिण गोवा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीक्ष सायोनारा लाड यांच्या न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्जही निकालात काढला होता.सुर्यकांत व हेमंत हे एकाच घरात रहात होते. मात्र त्या दोघांमध्ये जमिनीच्या वाटणीवरुन वाद होता. 23 फेब्रुवारीला घराभोवती कुंपण घालण्याचे काम सुरु केल्याने त्यांचा वाद शिगेला पोहचला याच वादावादीत मयताच्या डोक्यावर लाकडाच्या दंडुक्याने प्रहार केल्याने सुर्यकांत गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात आणले असता त्याला मरण आले होते.कुडचडेचे पोलीस निरीक्षक रवी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हेमंतला केरी - सत्तरी येथे जंगलात पकडले. तो दोडामार्ग परिसरात घनदाट जंगलात रहात होता. हिरो होंडा  आय स्मार्ट दुचाकी त्याच्याकडे होती, त्याची नंबरप्लॅट काढून ठेवली होती. दरम्यान शेवंती देसाई हिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 

टॅग्स :goaगोवाCrimeगुन्हा