शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ओखी चक्रीवादळाचा गोव्यातील किनारपट्टी भागात परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 19:33 IST

मडगाव : तामिळनाडूला आलेल्या ओखी चक्रीवादळाचा परिणाम आता गोव्यातही होऊ लागला असून, रविवारी किनारपट्टीभागात उभारलेल्या शॉकमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडून त्यात लाखोंची हानी झाली.

मडगाव : तामिळनाडूला आलेल्या ओखी चक्रीवादळाचा परिणाम आता गोव्यातही होऊ लागला असून, रविवारी किनारपट्टीभागात उभारलेल्या शॉकमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडून त्यात लाखोंची हानी झाली. या वादळामुळे कोलवा बीचवर आयोजित स्विमथॉन 2017 स्पर्धाही आयोजकांना रद्द करावी लागली.गेले काही दिवस केरळ, तामिळनाडू या राज्याबरोबर लक्षद्विप बेटावर ओखी चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. या वादळाचा गोव्यावरही परिणम जाणवू लागला आहे. किनारपटटीवरील शॉक्समध्ये सकाळी पाणी घुसण्याची घटना घडल्याने शॉक्समालक व तेथील कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला. किनारपट्टीवर ठेवलेल्या खाटींचेही नुकसान झाले. नंतर पाणी ओसरले. या घटनेत शॉक्स मालकांची बरीच हानी झाली आहे. किनारपट्टीवरील शॉक्समध्ये पाणी घुसले आहे. काल रविवारी मार्गशीर्ष पौर्णिमा असल्याने रात्रीच्या वेळी पाण्याची पातळी आणखीन वाढण्याची भीती शॉक्स ओनर्स संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कादरेज यांनी व्यक्त केली.ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागात सुरू असलेली जलक्रीडाही बंद ठेवण्यात आली होती. कॅप्टन ऑफ पोटर्सतसा आदेश जारी केला आहे. किनारपट्टीवर तैनात जीवरक्षकही समुद्राच्या पाण्यात कुणी उतरणार नाही, यासाठी दक्ष होते. पर्यटकांना पाण्यात न उतरण्याचा सल्ला दिला जात होता. दरम्यान, वादळाच्या पार्श्वभूमीवर कुटबण जेट्टीवरून काल रविवारी एकही ट्रॉलर्स मासेमारीसाठी समुद्रात गेला नाही. ट्रॉलर जेटीवर नांगरून ठेवल्याची माहिती कुटबण ट्रॉलर्स ओनर्स संघटनेचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी दिली. समुद्रात मासेमारीसाठी गेलेले काही ट्रॉलर्स अजूनही परतले नसल्याने मच्छिमा-यांमध्ये सद्या भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्यात मासळीचा तुटवडाही होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा