शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

दलित-मराठा एकत्र आल्यामुळेच भाजपाने घडवले भीमा-कोरेगाव प्रकरण - आनंद तेलतुंबडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 13:51 IST

दलित आणि मराठा समाज एकत्र आल्यामुळे भाजपाने धसका घेतला आणि भीमा-कोरगाव प्रकरण घडवून आणले, असे प्रतिपादन व्यवस्थापन क्षेत्रात जागतिक स्तरावर नाव असणारे संशोधक, भीमा-कोरगाव प्रकरणाचे अभ्यासक प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी येथे शुक्रवारी केले.

सुरेश गुदलेपणजी : दलित आणि मराठा समाज एकत्र आल्यामुळे भाजपाने धसका घेतला आणि भीमा-कोरगाव प्रकरण घडवून आणले, असे प्रतिपादन व्यवस्थापन क्षेत्रात जागतिक स्तरावर नाव असणारे संशोधक, भीमा-कोरगाव प्रकरणाचे अभ्यासक प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी येथे शुक्रवारी केले. गोव्यातील विविध संघटनांनी एकत्र येऊन प्रा. तेलतुंबडे यांचे व्याख्यान आयोजिले होते. लोकशाही, मतभेद आणि आर्थिक वाढ असा त्यांचा विषय होता. या व्याख्यानाच्या शेवटी ते भीमा-कोरगाव प्रकरणावर बोलले. काय घडवले गेले, कसे घडवले गेले ते त्यांनी उलगडले. जात आणि धर्माचा वापर करून ब्राह्मण्यवादी राजसत्तेने कसे डाव साधले असा त्यांच्या कथनाचा सूर होता. भीमा-कोरगावची ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यांनी सांगितली.

यानंतर ते म्हणाले, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्यासह सुमारे २५० वर संघटना एकत्र येऊन एल्गार परिषद आयोजिली होती. यामध्ये मराठा संघटनाही होत्या आणि याच एकत्रिकरणाचा धसका भाजपने घेतला. संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराच्या विषयाचा खोटा इतिहास रचला गेला. पर्यायी, खोटा इतिहास रचण्यात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे खूप काळांपासून सक्रीय आहेत. खरे तर मूळ गावात वडू-तुळापूर समेट झाला होता तरीही अन्य गावात हिंसेची तयारी केलेली. घरांमध्ये अगोदरच दगड जमवलेले, टँकरमध्ये रॉकेल भरून ठेवलेले. प्रा. तेलतुंबडे सांगत होते. दलितच दलितांना कसे मारतील? अशी विचारणाही त्यांनी केली.संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंविरोधात तक्रार दाखल झाली पण आजपर्यंत काहीही झाले नाही, असे ते म्हणाले. पोलिसांनीच कुभांड रचले. एल्गार परिषदेत भडकावू भाषणे दिली, अशी आवई उठवली. एल्गार परिषद माओवाद्यांची असल्याचा कांगावा केला.

समाजात माओवादी या विषयी खूप गैरसमज पसरवलेले आहेत. माओवादी म्हणजे रक्ताची लढाई असा समज पसरवला गेला आहे, असे ते म्हणाले. देशातील विचारवंतांच्या निवासस्थानावर छापे टाकले गेले. त्यावेळी प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या गोव्यातील घरांवरही छापा टाकला होता. ते घरी नव्हते. त्यांच्या पत्नी अगोदरच मुंबईला गेल्या होत्या. तेही मुंबईत होते. गोवा इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंच्ट महाविद्यालयात प्रा. तेलतुंबडे वरिष्ठ प्राध्यापक आहेत. छापा टाकला तेव्हा सुरक्षा रक्षकांना धमकावले, सहकाऱ्यांनाही पोलिसांनी धमकावल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी घराचा व्हिडिओ घेतला आणि ते गेले. ते म्हणाले, पोलिस काहीही करू शकतात. आमच्याबाबतीत षड़यंत्र रचू शकतात तर इतरांबाबत काहीही होईल. पोलीस कोणालाही अटक करू शकतात.संगणक म्हणजे सत्य साईबाबाप्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या निवासस्थानी छापा घातला तेव्हा संगणक ताब्यात घेतल्याचे बोलले गेले. या संदर्भात प्रा. तेलतुंबडे म्हणाले, संगणक म्हणजे सत्य साईबाबा आहे, तुम्ही मागाल ते संगणक देऊ शकतो. जसे सत्या साईबाब हवेत वस्तू काढत तसे. त्यामुळे पोलिसांनी संगणकांवर मिळालेली माहिती म्हणून जे काही जाहीर केले आहे ते शंभर टक्के कुभांड आहे. खरे तर राजकारणी, पोलिस आणि न्याय-व्यवस्था स्वतंत्र पाहिजे पण आपल्या देशात या तिन्ही व्यवस्था हितसंबंधित आहेत. 

 

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारMilind Ekboteमिलिंद एकबोटेSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी