शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील 12 खनिज खाणींची मान्यता संपुष्टात; प्रदूषणाचा आयआयटीकडून अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 21:10 IST

गोव्यातील सोनशी गावातील बारा खनिज खाणींना गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेले कनसेन्ट टू ऑपरेट संपुष्टात आले आहेत. यामुळे आता तरी ह्या बारा खाणी चालू शकणार नाहीत. त्यांना नव्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवा व जल प्रदूषण कायद्याखाली मान्यता घ्यावी लागेल.

पणजी : गोव्यातील सोनशी गावातील बारा खनिज खाणींना गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेले कनसेन्ट टू ऑपरेट संपुष्टात आले आहेत. यामुळे आता तरी ह्या बारा खाणी चालू शकणार नाहीत. त्यांना नव्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवा व जल प्रदूषण कायद्याखाली मान्यता घ्यावी लागेल. दुस-याबाजूने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीवेळी मुरगाव पोर्ट ट्रस्टला पत्र लिहावे आणि यापुढे कोळसा वाहतूक ही टार्परेलिनऐवजी स्टीलचे आच्छादन टाकून केली जावी, अशी सूचना करावी असे ठरले आहे.सोनशीमध्ये एकूण तेरा खनिज खाणी होत्या. त्यापैकी एका खाणीला यापूर्वी कनसेन्ट टू ऑपरेटचे नूतनीकरण करून मंडळाने दिलेले आहे. उर्वरित बारा खाणींचे कनसेन्ट टू ऑपरेट संपुष्टात आले. त्यामुळे ह्या खनिज खाणी सध्या तरी चालू शकणार नाहीत. बाराही खाणींनी आपल्याला कनसेन्ट टू ऑपरेटचे नूतनीकरण करून मिळावे म्हणून अर्ज केले आहेत. मंडळाने अजून त्याविषयी काही निर्णय घेतलेला नाही. सोनशीतील प्रदूषणाचा विषय यापूर्वी न्यायालयात पोहचल्यानंतर सरकारला व प्रदूषण नियंत्रण मंडळाला कडक भूमिका घ्यावी लागली होती. सोनशीतील खाणींना मंडळाने पूर्वी कारणो दाखवा नोटीस पाठवली होती. तथापि, कनसेन्ट टू ऑपरेट रद्द झाल्याने ही नोटीस मंडळाने बुधवारी मागे घेतली आहे.ओरीसाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाडय़ाच्या आधारे 1994 सालच्या ईसींविषयी प्रश्न विचारून मंडळाने  राज्यातील 17 खनिज खाणींना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. त्या नोटीसीला या कंपन्यांनी उत्तर दिले. यापुढे त्या उत्तराच्या अनुषंगाने कोणती भूमिका घ्यावी हे मंडळ ठरवणार आहे. त्यासाठी मंडळाने कायदेशीर सल्ला मागितला आहे.वास्कोमधील प्रदूषणाच्या विषयावर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. बुधवारची बैठक पर्यावरण सचिव दौलतराव हवालदार यांनी घेतली. कोळसा वाहतूक ही प्रदूषण होणार नाही अशा पद्धतीने व पूर्णपणो झाकून म्हणजेच टार्परेलिनऐवजी स्टीलचे शीट घालून केली जावी, अशी सूचना मंडळाकडून आता लवकरच मुरगाव बंदराला व कोळसा वाहतुकीशीसंबंधित कंपन्यांना केली जाणार आहे. मुरगाव बंदरात प्रत्यक्ष कोळसा हाताळणी ही पूर्णपणो डोम मध्ये केली जावी, अन्यत्र कुठेच केली जाऊ नये अशी सूचनाही एमपीटीला केली जाणार आहे. सध्या जिंदाल, वेदांता, अदानी आदी कंपन्यांकडून कोळसा वाहतूक व हाताळणी केली जात आहे.

आयआयटीकडून अभ्यासदरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई येथील आयआयटीला वास्कोतील प्रदूषणाचा अभ्यास करण्यास सांगितले आहे. येत्या मार्चपासून अभ्यासाचे काम आयआयटीकडून सुरू केले जाणार आहे. वास्कोतील प्रदूषण हे नेमक्या कोणत्या कारणास्तव होते, हे आयआयटीकडून शोधून काढले जाणार आहे, असे मंडळाच्या एका अधिका-याने सांगितले.

टॅग्स :goaगोवा