शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

‘मांडवी’तील बोटींची गर्दी हेदेखील दुर्घटनेस कारण, बंदर कप्तान खात्याला प्राप्त झाला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 13:18 IST

पणजी : मांडवी नदीत अंतर्गत जलवाहतुकीला अडसर येत आहे. कसिनो, जलसफरी करणा-या बोटी, कोळसा तसेच खनिज वाहतूक करणा-या बार्जेस, मच्छिमारी ट्रॉलर्स यामुळे नेहमीच मांडवीच्या पात्रात गर्दी असते, अशा वेळी फेरीबोट वाहतुकीतही व्यत्यय येतो.

पणजी : मांडवी नदीत अंतर्गत जलवाहतुकीला अडसर येत आहे. कसिनो, जलसफरी करणा-या बोटी, कोळसा तसेच खनिज वाहतूक करणा-या बार्जेस, मच्छिमारी ट्रॉलर्स यामुळे नेहमीच मांडवीच्या पात्रात गर्दी असते, अशा वेळी फेरीबोट वाहतुकीतही व्यत्यय येतो. गुरुवारी पणजी-बेती जलमार्गावरील फेरीबोट भरकटण्यामागे मांडवी पात्रातील बोटींची गर्दी हेदेखील एक कारण असल्याचे मानले जाते.बंदर कप्तान खात्याला त्यासंबंधीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. मांडवीच्या पात्रात जागोजागी उभी केलेली कसिनो जहाजे, या कसिनोंवर ने-आण करण्यासाठी वापरल्या जाणा-या फीडर बोटी, मुरगाव बंदरातून कोळसा तसेच बंदरापर्यंत खनिज वाहतूक करणा-या मोठ्या बार्जेस, पर्यटकांना जलविहारासाठी मांडवी पात्रातून दर्यासंगमापर्यंत घेऊन जाणा-या पर्यटक बोटी, मालीम जेटीवर असलेले 350 हून अधिक मच्छीमारी ट्रॉलर्स यामुळे मांडवी नदीच्या पात्रात गर्दी वाढलेली आहे.मांडवी फिशरमेन्स को-आॅपरेटिव्ह सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा ट्रॉलरमालक सीताकांत परब यांनी सांगितले की, ट्रॉलर्स जेटीवरून बाहेर काढताना या बोटींच्या गर्दीमुळे मोठा त्रास होतो. कसिनोंवर ने आण करणा-या फीडर बोटींनी तर उच्छाद मांडला आहे. या फीडर बोटी रात्रंदिवस अविरतपणे चालू असतात. ट्रॉलर बाहेर काढणे त्यामुळे कठीण बनते. यातून एखाद्या मोठ्या दुर्घटनेचा धोका संभवतो. कोळसा वाहतूक करणा-या बार्जेसचीही ये जा चालू असते. सायंकाळी पाचनंतर येथील्सांता मोनिका जेटीवरून पर्यटकांना जल सफर घडविणा-या सुमारे 10 बोटी मिरामार दर्या संगमापर्यंत ये जा करीत असतात.बंदर कप्तान जेम्स ब्रागांझा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही मांडवीच्या पात्रात बोटींची गर्दी वाढल्याचे मान्य केले. गुरुवारी पणजीहून बेतीला जाण्यासाठी प्रवाशांना घेऊन निघालेली फेरीबोट भरकटून फेरी धक्क्यापासून 60 मीटर अंतरावर कांपालच्या दिशेने नदीत रुतली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व 37 प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. गुरुवारी रात्री घडलेल्या दुर्घटनेने एक गोष्ट उघड झाली आहे ती अशी की, नदी परिवहन खात्याकडे अशी आणीबाणीची स्थिती हाताळण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. गेल्या पाच वर्षांत मांडवी नदीत फेरीबोट तसेच अन्य बोटी भरकटण्याच्या अशा सहा घटना घडल्या. खराब हवामान हे एक कारण आहेच, परंतु त्याचबरोबर मांडवी नदीच्या पात्रात असंख्य बोटींनी गर्दी केल्यामुळे वाहतुकीत असलेला अडसर देखील अन्य कारण आहे. बोटींची गर्दी चुकवत मार्ग गाना फुलाचे खांबाला धडक देण्याचे प्रकारही घडतात अशा दुर्घटना अनेकदा घडलेले आहेत.

 

टॅग्स :goaगोवा