शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नशेत मर्सिडीसने तिघांना उडविणारा तुरुंगातच; पोलिसांच्या रणनीतीमुळे कोठडीत वाढ

By वासुदेव.पागी | Updated: August 17, 2023 17:03 IST

... त्यामुळे परेश अटकेत असलेला सिनाय सावर्डेकरच्या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवार दि.२१ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. 

पणजी : बाणस्तरी अपघात प्रकरण म्हार्दोळ पोलिसांकडून काढून घेऊन क्राईम ब्रँचकडे सोपविण्यात येत असल्याचे निवेदन राज्याचे सरकारी अतिरिक्त अभियोकक्ते प्रवीण फळदेसाई यांनी गुरूवारी उच्च न्यायालयात केले. त्यामुळे परेश अटकेत असलेला सिनाय सावर्डेकरच्या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवार दि.२१ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. 

म्हार्दोळ पोलिसांनी अटक केल्यानंतर परेशने जामीनसाठी फोंडा सत्र न्यायालयात धाव घेतली होती, परंतु सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यामुळे त्याने उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली होती. ११ ऑगस्ट रोजी खंडपीठात याचिका सादर करताना ‘तातडीने सुनावणी घ्यावी’ अशी मागणी त्याने केली होती. परंतु न्यायालयाने सुनावणीची तारीख ही १७ ऑगस्ट ठेवण्यात आली. आज जेव्हा न्यायालयात हे प्रकरण सुनावणीस आले तेव्हा प्रोसिक्युशनने वेगळीच रणनीती स्विकारताना हे प्रकरण म्हार्दोळ पोलिसांकडून क्राईम ब्रँचकडे सोपविण्यात येत असल्याचे न्यायालाला सांगितले. त्यामुळे या प्रकरणातील सुनावणी न्यायालयाला स्थगित ठेवावी लागली. सोमवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सोमवारी क्राईमब्रँच परेशच्या जामीन याचिकेवर आपले म्हणणे न्यायालयात स्पष्ट करणार आहे. बुधवारी या अपघत पीडितांच्या दिवाडी येथील कुटुंबियांनी आमदार राजेश फळदेसाई यांच्यासह मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची भेट घेऊन म्हार्दोळ पोलिसांच्या तपासाबद्दल असमाधान व्यक्त केले होते. हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. प्रकरण क्राईम ब्रँचकडे सोपविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिले होते. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. 

६ ऑगस्ट रोजी बाणस्तरी येथे दारुच्या नशेत भरधाव वेगात मर्सीडीस कार चालवून परेशने ६ वाहनांना ठोकर दिली होती. या अपघातात तिघांचा मृत्यु तर तिघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. मर्सीडीसमध्ये दारुच्या बाटल्याही सापडल्या होत्या. परेशची पत्नी मेघना सावर्डेकरही त्याच्या बरोबर यावेळी कारमध्ये होती. तिलाही अटक करण्याची मागणी स्थानिकांनी करून पोलीसस्थानकावर मोर्चा नेला होता. मात्र मेघना हिने फोंडा स त्र न्यायालयाकडून अंतरीम अटकपूर्व जामीन मिळविला असून २३ रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. 

मेघनाच्या याचिकामागून याचिकापोलिसांच्या तपासाला सहकार्य न देण्याचा निर्धार केलेल्या मेघना हिने म्हार्दोळ पोलिसांचा एकही समन्स जुमानला नाही. आता उच्च न्यायालयातही तिने पोलिसांच्या समन्सना आव्हान दिले आहे. आरोग्याच्या कारणामुळे पोलीस स्थानकात जाऊन जबानी देऊ शकत नसल्याचे तिने यािकेत म्हटले आहे. 

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस