शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात ड्रग्ज पार्ट्यांचा धुमाकूळ; विनोद पालयेकरांची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 18:54 IST

माङया शिवोली मतदारसंघासह उत्तर गोव्याच्या विविध किनारी भागांमध्ये ड्रग्जच्या व्यवसायाचा प्रचंड हैदोस सुरू आहे.

पणजी : राज्याच्या किनारपट्टी भागात ड्रग्जच्या समावेशाने पार्ट्यांचा धुमाकूळ सुरू आहे पण आपण लेखी माहिती देऊन देखील गृह खाते काहीच कारवाई करत नाही अशी टीका गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विनोद पालयेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

पालयेकर म्हणाले की, माङया शिवोली मतदारसंघासह उत्तर गोव्याच्या विविध किनारी भागांमध्ये ड्रग्जच्या व्यवसायाचा प्रचंड हैदोस सुरू आहे. रात्री दहार्पयत पार्ट्या करण्यास उपजिल्हाधिकारी परवानगी देतात पण त्याचा गैरफायदा घेऊन पहाटेपर्यत आयोजक रेव्ह पार्टी सुरू ठेवतात. त्यात ड्रग्जचा वापर मोठय़ा  प्रमाणात होतो. मी मुख्यमंत्र्यांना यापूर्वी माहिती दिली होती. मी आयजीपींनाही माहिती दिली. कोणकोणत्या भागांमध्ये ड्रग्जच्या पाटर्य़ा चालतात ते मी सांगितले पण गृह खाते निष्क्रीय आहे.

ड्रग्जचा धंदा केवळ किनारी भागातच मर्यादित राहिला नाही तर तो खेड्यापाड्यात पोहचला आहे. नवी पिढींना हा चुकीचा संदेश जात आहे. मी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना शुक्रवारी स्मरण पत्र पाठवले व पुन्हा पोलीस महानिरीक्षकांशी देखील याबाबत बोललो आहे. ते कारवाई करू एवढेच म्हणतात. आमच्या भागात तर एक पोलिस निरीक्षक व काही उपनिरीक्षक ड्रग्ज व्यवसायिकांच्या गाड्यांमधून फिरतात हे लोक देखील पाहत आहेत. यावरून सरकारच्या व पोलिसांच्याच मदतीने ड्रग्ज व्यवसाय चाललाय की काय असा प्रश्न पडत असल्याचे पालयेकर यांनी सांगितले.

दरम्यान, जर मुख्यमंत्री सावंत यांना गृह खाते सांभाळता येत नसेल तर त्यांनी ते खाते मंत्री मायकल लोबो यांच्याकडे सोपवावे. लोबो हे काम करून दाखविणारे मंत्री आहेत.शिवाय ते किनारी  भागातीलच असल्याने ते ड्रग्ज धंद्याविरुद्ध कारवाई करू शकतील, असे पालयेकर म्हणाले.

टॅग्स :goaगोवाDrugsअमली पदार्थ