शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबर ठरला गोवा पोलिसांसाठी ड्रग्सचा महिना, एक कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 20:54 IST

पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी अत्यंत किरकोळ प्रमाणात ड्रग्सची विक्री होत होती, परंतु पर्यटन हंगाम सुरू झाल्यानंतर हे प्रमाण अनेक पटींने वाढले आहे. दहा छाप्यात जेवढा अंमली पदार्थ सापडत नव्हता तेव्हा तेवढा अंमली पदार्थ एकाच छाप्यात सापडवा तसा महिनाभरात एक कोटी रुपयांहून अधिक ड्रग्स पकडणारा महिना ठरला. 

पणजी: पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी अत्यंत किरकोळ प्रमाणात ड्रग्सची विक्री होत होती, परंतु पर्यटन हंगाम सुरू झाल्यानंतर हे प्रमाण अनेक पटींने वाढले आहे. दहा छाप्यात जेवढा अंमली पदार्थ सापडत नव्हता तेव्हा तेवढा अंमली पदार्थ एकाच छाप्यात सापडवा तसा महिनाभरात एक कोटी रुपयांहून अधिक ड्रग्स पकडणारा महिना ठरला. डिसेंबर महिना हा गोवा पोलिसांसाठी अंमली पदार्थांचा पीक आणणारा महिना ठरावा असा महिना ठरला. जिल्हा पोलीस आणि अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून या महिन्यात अनेक छापे टाकण्यात आले आणि मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. देशी तसेच विदेशी ड्रग्स एजंटना पकडण्यात आले. १२ डिसेंबर रोजी पेडणे येथे सर्वात मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला. एकूण ६४ लाख रुपये किंमतीचे एल एसडी द्रव्य जप्त करण्यात आले. १७ डिसेंबर रोजी म्हापसा येथे एकूण १८ लाख रुपये किंमतीचा ६ किलो चरस  पकडण्यात आला.  २१ रोजी चार लाख रुपयांचा अंमली पदाथ कांदोळी येथे तर २२ रोजी हरमल येथे ८ लाख रुपये किंमतीचा २.७ किलो चरस पकडण्यात आला.  या शिवाय कळंगुट पोलिसांनीही अनेक छापे टाकून एकावेळी ३ लाखापासून १० लाख रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. गोव्यात येणारा बहुतेक अंमली पदार्थ हा नेपाळमार्गे आणला जात असल्याचे तपासातून आढळून आले आहे. एका ड्रग्स एजंटला पकडल्यानंतर त्याची चौकशी होऊन ड्रग्स डिलरच्या साखळीचा पत्ता लागेल अशी अपेक्षा असते. परंतु तसे सहसा होत नाही. पकडला गेलेला माणूस आपल्या वरच्या साखळीची माहिती कशीच देत नसतो. आपल्याला त्यापुढे काहीच ठाऊक नाही असेच त्यांचे म्हणणे असते. त्यातही पकडला गेलेला नायजेरियन नागरीक असला तर ते तोंडही उघडत नाहीत अशी माहिती एका पोलीस अधिका-याकडून देण्यात आली. गोव्यात येणारा एकूण अंमली पदार्थ आणि पकडला जाणारा अंमली पदार्थ यात तफावत असते का? पोलिसांना गुंगारा देत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचे व्यवहार आणि सेवन होत आहे काय?  संघटित असलेली अंमली पदार्थ जगताची लॉबी पोलिसांपेक्षा वरचढ ठरत आहे काय? असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या विषयी वरिष्ठ पोलीस अधिका-याने गोव्यात अंमली पदार्थंच्या व्यवहारावर वचक ठेवण्यास यश मिळाल्याचे म्हटले आहे. अंमली पदार्थाविरोधीच्या कारवाईत  पोलिसांची मदार असते ती खब-यांवर. परंतु सध्या खब-यांचाच दुष्काळ असल्यामुळे पोलिसांसमोर अव्हान ठाकले आहे.

टॅग्स :goaगोवाDrugsअमली पदार्थ