शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

ड्रग्स व सेक्स डेस्टिनेशन, पर्यटन नकाशावर गोव्याची नवी ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 18:38 IST

एकेकाळी पर्यटकांमध्ये गोव्याची प्रतिमा फेसाळटे समुद्र आणि त्याचबरोबर फेसाळणारे बियरचे ग्लास अशी होती. मात्र आता ही ओळखही बदलू लागली आहे. सध्या गोवा पर्यटकांमध्ये ड्रग्स व सेक्स डेस्टिनेशन म्हणून परिचित होत आहे.

सुशांत कुंकळयेकरमडगाव : एकेकाळी पर्यटकांमध्ये गोव्याची प्रतिमा फेसाळटे समुद्र आणि त्याचबरोबर फेसाळणारे बियरचे ग्लास अशी होती. मात्र आता ही ओळखही बदलू लागली आहे. सध्या गोवा पर्यटकांमध्ये ड्रग्स व सेक्स डेस्टिनेशन म्हणून परिचित होत आहे. सध्या गोव्यात पर्यटन हंगाम चालू असताना मागच्या तीन दिवसात तीन सेक्स रॅकेटस् पोलिसांनी उघडकीस आणल्यामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 21 नोव्हेंबर रोजी हणजुण पोलिसांनी एक ऑनलाईन सेक्स रॅकेट उघडकीस आणताना चारजणांना अटक केली होती. या कारवाईत पोलिसांनी एका रशियन युवतीसह एकूण चार युवतींना मुक्त केले होते. त्याच्या दुस:याच दिवशी कळंगूट पोलिसांनी एका स्टार हॉटेलवर धाड घालून वेश्या व्यवसाय उघडकीस आणताना दोघांना अटक करीत एका युवतीला सोडविले होते. या घटना ताज्या असतानाच 23 नोव्हेंबर रोजी मडगावात एका ग्राहकाला पुरविण्यासाठी हणजुणहून दोन युवती आणल्या जात आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर केलेल्या कारवाईत एका इसमाला करतानाच दिल्लीच्या दोन युवतींना मुक्त केले होते.

एकाबाजुने गोव्यात ड्रग्स केसीस वाढत असतानाच सेक्स रॅकेटस्ही उघडकीस येत असल्याने राज्यातील समतोल तर बिघडणार नाही ना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आतार्पयत गोव्यात तब्बल 132 ड्रग्स विषयक प्रकरणो उघडकीस आली असून वेश्या विषयक 35 गुन्हे नोंद झाले आहेत. त्यातील पर्यटकांची गर्दी असलेल्या कळंगूट पोलीस स्थानकाच्या हद्दीत आतार्पयत अशाप्रकारची 9 रॅकेटस् उघडकीस आली आहेत.

पोलिसांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणो गोव्यात येणा:या पर्यटकांना तरुणी पुरविण्यासाठी मुंबई, दिल्ली व बंगळुरु येथून गोव्यात मोठय़ा प्रमाणावर तरुणी आणल्या जातात, केवळ एका आठवडय़ासाठीच त्यांना येथे ठेवतात त्यानंतर मोबाईल किंवा ऑनलाईन माध्यमांतून ग्राहकांशी संपर्क साधून या तरुणी त्यांना पोचवितात. या एका आठवडय़ासाठी या तरुणींना दोन ते तीन लाख रुपयांची बिदागी देऊन गोव्यात आणले जाते. मात्र त्यांना गोव्यात आणणारा दलाल या एकाच आठवडय़ात स्वत:ची तीन चार लाखांची कमाई करुन मोकळा होतो. विशेषत: बांगला देशातील गरीब मुलींना या व्यवसायात बांधले जाते अशी माहिती पोलिसांनी दिली.

गुरुवारी मडगावात ज्या दोन तरुणींना मुक्त करण्यात आले त्याही 15 दिवसांपूर्वी दिल्लीहून गोव्यात आल्या होत्या. हणजुणो येथे एका हॉटेलात त्यांची रहाण्याची सोय केली होती. एक स्थानिक एजंट मोबाईलवरुन ग्राहकांशी संपर्क साधून त्यांना या तरुणी पुरवित होता. गुरुवारी एका अज्ञात व्यक्तीकडून मडगाव पोलिसांना मडगाव रेल्वे स्थानकावर एका ग्राहकाला पुरविण्यासाठी दोन तरुणींना आणले जात आहे याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात हा एजंट अलगद सापडला.ओल्ड गोवा फेस्तातही एस्कोर्ट सव्र्हीस

गोव्यातील सेक्स ट्रेड व्यावसायिकांनी धार्मिक स्थळांनाही सोडलेले नाही. सध्या ओल्ड गोवा येथे सेंट फ्रान्सिस ङोवियरचे फेस्त चालू आहे. या ठिकाणीही एस्कोर्ट मुली पुरविण्यासाठी वेबसाईटवर लिंकस् दिल्या आहेत असा गौप्यस्फोट गोवा वुमन्स फोरम या संघटनेने केली आहे. एका वेबसाईटवर ही जाहिरात केली जात आहे असे या फोरमच्या लॉर्ना फर्नाडिस यांनी केली आहे. यासंबंधी पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

टॅग्स :goaगोवा