शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

गोवा पोलिसांकडे ड्रोन टिपणारी सिस्टम, सुरक्षेला वेगळे आयाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 21:01 IST

अवकाशाततील बेकायदेशीर ड्रोनवर लक्ष्य ठेवण्यासाठी गोवा पोलिसांनी ड्रोन डिटेक्शन सिस्टम मिळवली असून, त्याची यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे.

पणजी: अवकाशाततील बेकायदेशीर ड्रोनवर लक्ष्य ठेवण्यासाठी गोवा पोलिसांनी ड्रोन डिटेक्शन सिस्टम मिळवली असून, त्याची यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे. अशा प्रकारची ही यंत्रणा उपलब्ध असलेले गोवा पोलीस हे देशातील पहिलेच पोलीस खाते ठरले आहे.स्टार्टअप योजनेअंतर्गत बंगळुरू येथील आयआयओ टेक्नोलोजी प्रायव्हेट लिमिटेडतर्फे हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.या उपकरणाच्या ५ किलोमीटर त्रिज्येच्या अंतरापर्यंतच्या टापूत टेहळणी करण्याची क्षमता आहे. उडविले जाणारे अनधिकृत ड्रोन व इतर कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी ही माहिती दिली. विशेषत: दहशतवादी विरोधी पथकाला त्याचा उपयोग होणार आहे. ड्रोन हल्ल्यांच्या या युगात अनधिकृत ड्रोनवर लक्ष्य ठेवण्यासाठीच ते गोवा पोलिसांनी आणले आहे. या सिस्टमद्वारे केवळ ड्रोन टिपले जातात, असे नव्हे तर ड्रोन उडविणाऱ्यालाही टिपण्याची त्याची क्षमता आहे. या सिस्टीमची गोव्यात यशस्वी चाचणीही घेतली आहे.वर्षभरापूर्वी लांब पल्ल्याची छायाचित्रे टिपण्याची क्षमता असलेले ड्रोन गोवा पोलिसांच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आले होते. गोव्यातील किना-यावर झालेल्या नववर्षारंभ पार्ट्या व खाण समर्थकांच्या आंदोलनात त्यांचा अत्यंत कुशलपणे वापर करण्यात आला होता. आता ड्रोन डिटेक्शन सिस्टमचा समावेश करण्यात आल्यामुळे सुरक्षेला वेगळे आयाम मिळाले आहेत.