लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'खुर्चीची गुर्मी डोक्यात नको. अधिकारी म्हणून नव्हे, तर लोकांचे सेवेकरी म्हणून काम करा,' असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नव्यानेच नियुक्ती झालेल्या २१ लेखापालांना बजावले. राज्य कर्मचारी निवड आयोगातर्फे निवड झालेल्या या २१ जणांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली.
मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, लेखा संचालिका तेरेझा फर्नाडिस याप्रसंगी उपस्थित होत्या. मुख्यमंत्री म्हणाले की, एकदा खुर्चीत बसल्यानंतर आपण अधिकारी असल्याची गुर्मी डोक्यात चढते. तसे करू नका. लोकांचे सेवेकरी म्हणून वागा व व लोकांची कामे तत्परतेने करा. राज्य कर्मचारी निवड आयोगातर्फे विविध सरकारी पदांसाठी गुणवत्तेवर उमेदवारांची निवड केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यात टेक्निकल असिस्टंट, कनिष्ठ अभियंता आदी पदे आयोगामार्फत भरण्यात आली आहेत.
मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय
बंदर कप्तान खात्यात उपकप्तान पद निर्माण करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. तिस्क, फोंडा येथे आरोग्य खात्याची जमीन कला व संस्कृती खात्याकडे होती. ती परत आरोग्य खात्याकडे देण्यात आली. तिथे आरोग्य खात्याचा प्रकल्प येईल. कुडणे येथील सतीचे भाट येथे रस्त्याच्या बांधकामाला, जमिनीच्या देवाण-घेवाणीला मान्यता दिली. गोमेकॉत सामान्य शस्त्रक्रिया विभागात रिक्त पद भरेपर्यंत कंत्राटी पद्धतीने व्याख्यात्यांची दोन पदे भरण्यासाठी मान्यता दिली. गोमेकॉत पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशासाठी एससी, एसटी, ओबीसी व आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील उमेदवारांसाठी रोस्टर पद्धत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तुये इस्पितळाचे २ रोजी होणार उद्घाटन
तुयें हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन २ फेब्रुवारी रोजी निश्चित झाले असून, ५० परिचारिका व इतर मिळून एकूण २७ कर्मचारी नियुक्तीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पत्रकार परिषदेस मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, 'लोकांच्या मागणीनुसार हे इस्पितळ गोमॅकॉशी संलग्न करणारी अधिसूचना याआधीच काढण्यात आलेली आहे.आवश्यक ते मनुष्यबळ भरती व इतर व्यवस्थेबाबत महत्त्वाच्या प्रस्तावांना बैठकीत मंजुरी दिली. तुयें हॉस्पिटल व रिसर्च सेंटर लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला.'
अजित पवारांना आदरांजली!
दरम्यान, पत्रकार परिषद सुरू होण्याआधी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त करून एक मिनिट स्तब्धता पाळून आदरांजली वाहिली.
Web Summary : Chief Minister Pramod Sawant advised newly appointed officers to serve as public servants, not to be arrogant. Cabinet approved posts for the Captain of Ports, land transfer for health projects, road construction, and lecturer positions. Tuem Hospital's inauguration is set for February 2. CM also mourned Ajit Pawar's death.
Web Summary : मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने नए अधिकारियों को अहंकार न करने और जनता सेवक बनने की सलाह दी। मंत्रिमंडल ने बंदरगाह कप्तान के पद, स्वास्थ्य परियोजनाओं के लिए भूमि हस्तांतरण, सड़क निर्माण और व्याख्याता पदों को मंजूरी दी। 2 फरवरी को तुएम अस्पताल का उद्घाटन। मुख्यमंत्री ने अजित पवार के निधन पर शोक व्यक्त किया।