शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा विसर्जन नको; सत्तास्थापनेसाठी संधी द्या, काँग्रेसकडून राष्ट्रपतींना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 19:23 IST

गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असून काँग्रेसने आता थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून आपल्याला सत्ता स्थापनेची संधी द्यावी, असे साकडे घातले आहे.

पणजी : गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असून काँग्रेसने आता थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून आपल्याला सत्ता स्थापनेची संधी द्यावी, असे साकडे घातले आहे. काँग्रेसला संधी दिल्याशिवाय विधानसभा विसर्जित करु नये, अशी विनंती पक्षाने केली आहे. राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांना याबाबतीत आवश्यक ते निर्देश द्यावेत, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.विधानसभा विसर्जित केली जाऊ शकते, अशी भीती काँग्रेसला आहे. काँग्रेसकडे बहुमत असल्याचा पक्षाचा दावा असून सत्ता स्थापनेसाठी बोलवावे, अशी मागणी करण्यात आलेली आहे. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची या पत्रावर सही असून ते म्हणतात की, ह्यराज्यात प्रशासन पूर्णपणे कोलमडलेले आहे आणि त्यामुळे जनता मात्र भरडली जात आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. लोकांच्या मूलभूत समस्याही सुटलेल्या नाहीत. या सरकारने लोकांचा तसेच सभागृहाचाही विश्वास गमावला असून हे सरकार अल्पमतात आले आहे.ह्णचोडणकर यांचे असेही म्हणणे आहे की, १६ आमदारांसह विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेला काँग्रेस सत्ता स्थापनेसाठी तयार असून विधानसभेत कोणत्याही क्षणी बहुमत सिध्द करु शकतो. राज्यपालांकडेही याआधी पक्षाने राज्यातील भाजप आघाडी सरकार बडतर्फ करुन काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी बोलवावे, अशी मागणी करणारी निवेदने दिलेली आहेत.ह्णकोणत्याही परिस्थितीत विधानसभा विसर्जित केली जाऊ नये, अशी मागणी करताना तसे निर्देश राष्ट्रपतींनी राज्यपालांना द्यावेत आणि मार्गदर्शनही करावे. कट कारस्थान करुन विधानसभा विसर्जनाची चाल खेळली जाऊ शकते. याआधी पर्रीकर मुख्यमंत्री असताना अशीच चाल खेळून त्यांनी विधानसभा विसर्जन करुन घेतलेले आहे. त्याची पुनरावृत्ती होऊ देऊ नका. घटनेचा कोणत्याही प्रकारे उपमर्द करु देऊ नका. अशी चाल झाल्यास ती मोडून काढा, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.काँग्रेसने याआधी राज्यपालांना चार निवेदने दिली. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे पक्षाने आता थेट राष्ट्रपतींनाच साकडे घातले.दरम्यान, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनीही पक्षाकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा केला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस