शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

विरोधात बसून विकास होत नाही - नेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 22:43 IST

विरोधी बाकांवर बसून सर्व मतदारसंघांमध्ये विकास करता येत नाही. सरकारच्या विकासाच्या योजना विरोधकांच्या मतदारसंघात पोहचायला हव्यात.

पणजी - विरोधी बाकांवर बसून सर्व मतदारसंघांमध्ये विकास करता येत नाही. सरकारच्या विकासाच्या योजना विरोधकांच्या मतदारसंघात पोहचायला हव्यात. आम्ही सरकारमध्ये गेल्याने आता आमचे मतदारसंघ विकसित होतील, असे भाजपचे नवे मंत्री फिलिप नेरी रॉड्रीग्ज यांनी शनिवारी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले.नेरी हे वेळ्ळी मतदारसंघाचे आमदार आहेत. या मतदारसंघात ख्रिस्ती मतदारांची संख्या जास्त आहे. नेरी यांनी यापूर्वी स्वर्गीय मनोहर  पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात काम केले होते. नेरी म्हणाले, की विरोधी बाकांवर गप्प बसून राहण्यासाठी आम्हाला लोकांनी निवडून दिलेले नाही. सरकारकडून कामे करून घेण्यासाठी आम्हाला निवडले गेले. आमच्या मतदारसंघात जर विकास कामे व्हायची असतील तर आम्हाला सत्तेमध्ये जावेच लागेल. त्यामुळेच आम्ही सत्तेमध्ये सामिल झालो. आम्ही भाजपमध्ये गेलो व मंत्री झाल्याने आता सरकारचा विकास कार्यक्रम आम्हाला आमच्या मतदारसंघातही राबविता येईल. रोजगार संधीही निर्माण करता येईल.फिलिप नेरी म्हणाले, की लोकसभा निवडणुकीवेळी देशभर लोकांनी भारतीय जनता पक्षाला कौल दिला. गोव्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुकांवेळीही लोकांनी भाजपला कौल दिला. आम्ही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटलो तेव्हा त्यांनी आमचे मोठय़ा उत्साहाने स्वागत केले. भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही आम्ही भेटलो तेव्हाही आमचे मोठय़ा सन्मानाने स्वागत केले गेले. भाजपमध्ये आमच्याविषयी कोणताच पक्षपात होणार नाही. आम्ही चांगले काम करून दाखवू. प्रशासन लोकांच्या दारात पोहचवू. शेवटी आम्ही राजकारणात लोकसेवा करण्यासाठीच आलो आहोत. मंत्री म्हणून काम करण्याचा मला अनुभव आहे. आम्ही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भाजपचेही काम वाढवू.

टॅग्स :BJPभाजपाgoaगोवा