शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अपात्रता: आठ आमदारांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश

By वासुदेव.पागी | Updated: December 4, 2023 16:29 IST

काँग्रेस मधून भाजपात आलेल्या आठ आमदाराविरोधात काँग्रेसचे राष्ट्रीय समिती सदस्य गिरीश चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली याचिका सोमवारी सुनावणीस आली.

पणजी: गोव्यातील आठ आमदारांविरुद्धच्या अपात्रता याची का प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आठ प्रतिवादी आमदारांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. 

काँग्रेस मधून भाजपात आलेल्या आठ आमदाराविरोधात काँग्रेसचे राष्ट्रीय समिती सदस्य गिरीश चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली याचिका सोमवारी सुनावणीस आली. गोव्याचे सभापती रमेश तवडकर यांच्याकडे त्यांनी सादर केलेली अपात्रता याचिका प्रलंबित आहे. सभापतींना या प्रकरणात ठराविक मुदतीत हे प्रकरण निकालात काढण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावा अशी मागणी चोडणकर यांनी या याचिकेत केली होती. याचिकादाराला या प्रकरणात अंतरिम दिलासा अपेक्षित होता. मात्र तसा दिलासादायक  स्पष्ट आदेश न्यायालयाने दिलेला नाही. परंतु  सुनावणी दरम्यान न्यायालयाने सर्व आठही प्रतिवादी आमदारांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. तसेच या प्रकरणात दोन आठवड्यानंतर पुन्हा सुनावणी घेतली जाणार आहे. त्यापूर्वी प्रतिवादीना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.

आमदार आलेख शिकवेरा यांच्या नेतृत्वाखाली आठ आमदार काँग्रेस मधून भाजपात दाखल झाले होते. त्यापैकी सिक्वेरा या एकच आमदाराला  मंत्रिमंडळात सामावून घेऊन मंत्री बनविण्यात  आले आहे. आमदार दिगंबर कामत, संकल्प आमोणकर, रुडाल्फ फर्नांडिस, मायकल लोबो, डिलायला लोबो, केदार नाईक आणि राजेश फळ देसाई हे इतर आमदर आहेत.  दरम्यान काँग्रेस पक्षाने सिक्वेरा यांच्या मंत्रिमंडळातील  समावेशास आक्षेप घेतला होता. त्यांच्याविरुद्ध अपात्रता याचिका प्रलंबित असल्याने त्यांना मंत्रिपदाची शपथ देऊ नये अशी मागणी काँग्रेसने गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्ले यांच्याकडे केली होती.

टॅग्स :goaगोवाMLAआमदार