दिगंबर कामत यांच्या कार्यालयावर दगडफेक
By admin | Published: October 26, 2015 03:00 AM2015-10-26T03:00:22+5:302015-10-26T03:00:49+5:30
मडगाव : मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या मालभाट येथील कार्यालयावर रविवारी दुपारी अज्ञातांनी दगडफेक केली. यात कार्यालयातील काचा फुटल्या. दुपारी साडेतीनच्या दरम्यान
मडगाव : मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या मालभाट येथील कार्यालयावर रविवारी दुपारी अज्ञातांनी दगडफेक केली. यात कार्यालयातील काचा फुटल्या. दुपारी साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडली. त्या वेळी कामत आपल्या समर्थक उमेदवाराच्या निवडणुकीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी बाहेर गेले होते. दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी दगडफेक करून पोबारा केला. अज्ञातांनी हेल्मेट परिधान केले होते.
कामत यांनी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. हा भाडोत्री हल्ला असून, त्यामागील मास्टरमाइंडला पोलिसांनी शोधून काढावे, अशी मागणी केली. चोवीस तासांत या प्रकरणाचा छडा लावावा, अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली. दिलेल्या मुदतीत जर दोषी सापडले नाहीत तर पुढील दिशा कार्यकर्तेच ठरवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. भादंसंच्या ४२७ व ३३६ कलमाखाली हे प्रकरण पोलिसांनी नोंदवून घेतले आहे. नीलेश प्रभू तक्रारदार आहेत. वरवर दिसते तशी ही घटना साधीसुधी नाही. १९८५ पासून आपण राजकारणात आहे. तेव्हापासून आपले हेच कार्यालय आहे. असे कृत्य करण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नव्हती. माझ्या राजकीय कारकिर्दीत अशी घटना प्रथमच घडली आहे, असे कामत म्हणाले.
दगडफेकीची घटना घडली तेव्हा कार्यालयात कामत यांचे पीएसओ नीलेश प्रभू व अन्य एकजण आतमध्ये होते. दगडफेक झाल्यानंतर प्रभू हे बाहेर आले असता, पांढऱ्या रंगाच्या अॅक्टिव्हा दुचाकीवरून दोघेजण वेगात जात असल्याचे त्यांनी पाहिले. त्या दुचाकीला नंबर प्लेटही नव्हती. त्यामुळे हा (पान १० वर)