शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात विरोधी पक्षनेतेपदी दिगंबर कामत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 20:44 IST

मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या दिगंबर कामत यांना पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपद

पणजी : विधानसभेत राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून दिगंबर कामत काम पाहतील हे बुधवारी स्पष्ट झाले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून कामत यांची निवड अखिल भारतीय काँग्रेसने (एआयसीसी) मंजूर केली आहे.विधानसभा अधिवेशनास गेल्या सोमवारी आरंभ झाला. मात्र काँग्रेसच्या पाच आमदारांपैकी काँग्रेसचा विधिमंडळ पक्ष नेता कोण हे ठरत नव्हते. कुडतरीचे आक्रमक आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे विरोधी पक्षनेता बनण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांना संधी देण्यास काँग्रेसचे अन्य आमदार तसेच काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्वही तयार नाही याचे संकेत गेले दोन दिवस मिळत होते. कामत हे माजी मुख्यमंत्री असून त्यांना प्रथमच विरोधी पक्षनेता होण्याची संधी मिळाली आहे.

बाबू कवळेकर यांनी अन्य नऊ आमदारांसोबत गेल्या आठवड्यात काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद रिकामे झाले होते. यापूर्वीच्या काळात प्रतापसिंग राणे, रवी नाईक, लुईङिान फालेरो आदींनी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते म्हणून काम केलेले आहे. कामत मुख्यमंत्रीपदी असताना काँग्रेसच्या विधिमंडळ गटाचे नेते होते. पण आता त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. विरोधी बाकावर बसणाऱ्या ज्या पक्षाकडे चाळीसपैकी दहा टक्के आमदार असतात. त्या पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्षनेतेपद प्राप्त होत असते. काँग्रेसचे पाच आमदार असल्याने कामत यांचा मार्ग मोकळा झाला. त्यांना विधानसभा प्रकल्पात केबिन मिळेल व सरकारी वाहनही मिळेल. दरम्यान, कामत यांच्या निवडीला एआयसीसीने मान्यता दिल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी बुधवारी सायंकाळी जाहीर केले. कामत यांना आपले पूर्ण सहकार्य व पाठींबा मिळेल असेही चोडणकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस