शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

खाण घोटाळा प्रकरणात दिगंबर व डॉ. हेदेंविरोधात आरोपपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 20:15 IST

लुईस बर्जर कथित लाचखोरी प्रकरणात माजी मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी खाण घोटाळा प्रकरणात त्यांच्यामागे लागलेले शुक्लकाष्ठ संपलेले नाही.

मडगाव : लुईस बर्जर कथित लाचखोरी प्रकरणात माजी मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी खाण घोटाळा प्रकरणात त्यांच्यामागे लागलेले शुक्लकाष्ठ संपलेले नाही. कुळे येथील डॉ. प्रफुल्ल हेदे यांच्या खाणीला कॉन्डोनेशन ऑफ डिलेची बेकायदेशीर सवलत दिल्याचा आरोप ठेवून क्राईम ब्रँचच्या एसआयटीने गुरुवारी कामत यांच्यासह प्रफुल्ल हेदे आणि भूगर्भ शास्त्रज्ञ ए. टी. डिसोझा यांच्या विरोधात फसवणूक व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली मडगावच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.मडगावच्या प्रधान सत्र न्यायालयात गुरुवारी क्राईम ब्रँचचे निरीक्षक उदय नाईक यांनी सुमारे 1572 पानांचे हे आरोपपत्र दाखल केले. 1998 ते 2007 या कालावधीत कामत यांच्याकडे खाण मंत्रीपद असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन डॉ. हेदे यांच्या कुळे येथील बंद खाण कॉन्डोनेशन ऑफ डिलेची सवलत देऊन बेकायदेशीररित्या सुरुवात करण्याची परवानगी दिल्याचा ठपका या आरोपपत्रत ठेवण्यात आला आहे.या प्रकरणात 9 सप्टेंबर 2014 रोजी क्राईम ब्रँचने खाण खात्याने केलेल्या तक्रारीवर आधारित एफआयआर दाखल केला होता. यापूर्वी या प्रकरणात आपल्याला अटक होऊ नये यासाठी कामत यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. त्यानंतर खास न्यायालयाकडून त्यांना दिलासाही मिळाला होता. गुरुवारी क्राईम ब्रँचने दाखल केलेल्या या आरोपपत्राबरोबर सुमारे 50 साक्षीदारांची सूची जोडली आहे. या प्रकरणात लवकरच कामत व इतर दोघांना न्यायालयात हजर रहाण्यासाठी कोर्टातर्फे नोटीस येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :goaगोवा